पान:स्वरांत.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिनेमातल्या ममीसारखी वाटायला लागते.
 ह्यॅ ! वाढदिवस कसला साजरा करतेस ? वाढदिवस, पाटर्या, फुलांचे हार, ते खोटंखोटं हसणं. आय हेट ऑल दीज थिंग्ज. सॉरी माँ. टेल डॅडी.'
 ममी हातातला टाका तसाच सोडून मिलूकडे बघत राहते.
 गेल्या वर्षांपासून मिलू बदलत चाललाय. विलक्षण वदलत चाललाय.
 मिलू ... नुक्ता जन्मलेला साडेआठ पौंडी गोळा. कोवळया पिंपळपानासारखा. गुलाबी, लुसलुशीत.
 मिलू... नायकाच्या हातातली कोंबडीची तंगडी मागणारा, रडूनरडून थिएटरभर गोंधळ माजवणारा.
 मिलू ... ममीला 'माँच' म्हणणार म्हणून हट्ट धरणारा नि डॅडींच्या हातून मार खाणारा मिलू.
 कितीतरी रंगीबेरंगी चित्रे ममीच्या नजरेसमोरून तरळून जातात.
 दिवस किती भरारा जातात, मिलूच्या खेपेचे सगळेसगळे क्षण जसेच्या तसे आठवताहेत. जणू कालपरवाच जन्मलाय मिलिंद गेल्या वर्षी दोन वर्षांत किती बदललाय मिलू. हट्ट नाही. हसणं नाही, डोळे नेहमी कुठंतरी हरवलेले, जणू खूप दूरदूरच्या प्रवासाला निघालेत. ती थर्रकन शहारते. मिलिंदकडे एक नजर टाकून उठून आत जाते.
 ममीचा अस्फुट अुसासा त्याला जाणवला. गेलं वर्षभर या घरात मनच रमत नाही. गाडी ... एवढा मोठा बंगला ...

सांगण्यासारखं काहीच उरलं नाहीये / ३९