पान:स्वरांत.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




सांगण्यासारखं काहीच उरलं नाहीये..

 मिलू, बेटा डॅडींनी स्टेटस्-हून आणलेली जर्सी घातली नाहीस तू एकदाही. आणि तुझा बर्थ-डे जवळ आलाय. कुणाकुणाला बोलावायचं नि काय काय करायचं तेही सांग ना! "
 मिलिंद घुम्म.
 ममी विणण्यात गर्क. टाक्यावरची नजर ढिली न करता ती विचारतच राहते.
 'नारळाच्या करंज्या, मटरपॅटिस नि अंबा आईस्क्रीम करू या का नि राघूच्या मैत्रिणी आणि तुझे मित्र बोलवूया. कामाच्या रगाड्यातसुद्धा तुझे डॅडी तुझा वाढदिवस विसरले नाहीत. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा वाढदिवस आहे ना !' तो आता मोठा होणार. अठरा वर्षाचा, नि मी म्हणे लक्षच देत नाही त्याच्याकडे ! होय रे बिट्टू ? '
 ममी दोन वर्षांच्या पोराशी बोलावं तशी लाडलाडं बोलते. ती तशी बोलायला लागली की जाम बोअर होतं. निव्वळ