पान:स्वरांत.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तू कुठंही जाऊ शकतेस. तुझ्या यातना पाहवत नाहीत. कपाटात पैसे आहेत. तुला उपयोगी पडतील ... ...

अनंत

 अनंतचं हे पत्र. घरट्यातून खाली पडलेलं जखमी पिलू तळहातावर थरथरतंय. हे पिल्लू खाली टाकून पाठ फिरवून जाऊ मी? की त्या जखमांवरून हात फिरवीत राहू ?

* *

एका गांधारीच्या डायरीतली काही पाने / ३७