पान:स्वरांत.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वागत करायचं असतं नवऱ्याचं. मी पांढरीशुभ्र साडी आणलीय. वर हलके काळे बुंदके. साडी नेसून केव्हाची वाट बघतेय. बारा वाजून गेलेत; पण अजून पत्ता नाही !
 कधी कधी मन खूप उदासतं, आता या क्षणीही... मी पदवीधर आहे. सुशिक्षित आहे.
 गांधारीसारखे डोळे बांधून जगता येईल मला ?...

४-३-७२

 समोरच्या प्लॅटमधली सुरैना सागर आली होती. खूप गप्पा मारल्या. उमाची नि हिची ओळख आहे जुनी. आठ दिवसापूर्वीच आलीय. ही ' ब्लू नाईल' मध्ये रिसेप्शनिस्ट आहे.
 पूर्वीच आलीय, 'ही'ब्लू नाभील.' मध्ये रिसेप्शनिस्ट आहे.
 भुरे ... सोनेरी केस. मोठे डोळे. काहीसा सावळा तरीही तकतकीत रंग. किती गोड दिसते.!
 बटाटेवडे नि हैद्राबादी आलं-लसणीचं झणझणीत लोणचं दिलंन् तिला. अधाशासारखं खाल्लंन लोणचं. म्हणाली,
 'माझ्या हॉटेल-मॅनेजरनं हे लोणचं खाल्लं तर धावत येशील तुला न्यायला !'
 सुरैना असतानाच आज अचानक अनंत आले. केवढे दचकले आणि बाहेरच्या बाहेर पुन्हा सटकले.
 काय 'गूढ ' आहे अुकलतं नाही. मी खोलखोल रुततेय . असं सारखं वाटत राहतं.

३२ /स्वरांत