पान:स्वरांत.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 दादांनी लग्न करून दिलं. जबाबदारी संपवून टाकली. आईला भेटावंसं वाटतंय.
 मनातला गुंता आता सोसवत नाही.

९-३-७३

परवा इथं आजीकडे आले. अनंतनी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनी 'तू गेल्यावर करमणार नाही !' म्हणावं. जाऊ नकोस म्हणावं ! ' असं खूप वाटत होतं.
 पण ...
 'केव्हा येऊ ? ' विचारलं तर म्हणाले, 'केव्हाही ये. तुझ्या सोयीनं'.
 खूप दिवस राहायचं ठरवून आले होते.
 इथं आले तर किती परकं वाटतंय !
 माझ्या अस्तित्वाच्या खुणा जणू पुसून गेल्या आहेत या घरच्या ... ज्या घरात वयाची पंचवीस वर्षे घोलक्लीं, ते घर अवघ्या एक वर्षात इतकं दूर जावं ?
 फक्त आई मन गुंतवते.
 परवा निश्चित केलं मनानी.
 अनंत कसेही असोत; कुणीही असोत. त्यांनी मला माझं .दिलंय घर. हक्काचं घर ...

१५-६-७३

 काल परतले इथं. आठ दिवासांचं दूरपण. अनंत काल तरी लवकर येतील असं वाटलं होतं; पण कालही खूप

एका गांधारीच्या डायरीतली काही पाने / ३३