पान:स्वरांत.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'अनंतचा मूड गेला असावा. ते उठून बाहेर. मीही मागोमाग. मग थेट घरीच. कालपासून बोलेनासेच झालेत.

३-१२-७१

 शेजारची उमा रघुराजन विचारत होती. सुझे मिस्टर कोणत्या फर्ममध्ये आहेत ?
 काय खुळी आहे मी ! गेल्या सहा महिन्यांत नवऱ्याच्या नोकरीची सुद्धा चौकशी केली नाही मी. दादांनी मुलगा पसंत केला. मी माळ घातली. फक्त डिग्री कानांनी ऐकून घेतली.
 आधी ओळख शरीराची; मग मनाची.
 घरात सोफा आहे. प्रेशर कूकर आहे. शिवाय फ्रायपॅन, मिक्सी, टोस्टर ... सगळं काही आहे. सोनेरी फेममध्ये दिमाखणारी डिग्री बैठकीत आहे. मी तरी कशाला कराव्यात नसत्या चौकशा !
 तरी पण आज विचारणार आहे.

१४-१-७२

 काय विचित्र नोकरी आहे यांची! सकाळी दहापर्यंत घोरत पडायचं नि मग जेवून जे जायचं ते थेट रात्रीपर्यंत. मग रात्रीचे दोन काय आणि चार काय... इतकं थकून यायचं. की ग्लासभर दूध घेऊन बिछान्यावर आडवं झाल्यावर एकासेकंदात झोप, बाजूला तरुण बायको आहे याचीही दा नाही.
 आज संक्रांत. मी आणि उमानं जाऊन सुंदर साडी . आणलीय आज. पहिल्या संक्रांतीला काळी चंद्रकळा नेसून

एका गांधारीच्या डायरीतली काही पाने / ३१