पान:स्वरांत.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रूप असलं म्हणजे झालं ! आणि तुझं मन हवंय मला. रूप फार लवकर हरवतं...'
 खूप... खूप सुखावले मी. माझ्या मनात आलं, हे गोर देखण रूप, भरदार छाती, दाट कुरळे केस... हे सगळं माझं आहे...
 फक्त माझं... !!

२९-९-७१

 घरी खूप प्रेमळ आहेत. पण लग्न झाल्यापासून एकदाही बाहेर नेलं नाही. कदाचित लाजही वाटत असेल.
 काल हट्टच धरला, सिनेमाला जाऊ म्हणून. मुष्किलीनं तयार झाले.
 अलिशान सिनेमागृह. पायाखाली मखमली रुजामा. चौबाजूंनी आरसे. पुढे हे नि मागे मी. मी दिमाखानं चालतेय. इतक्यात समोरून एक देखणा, रुबाबदार तरुण आला. नि मागं होती एक तेलकट रंगाची मुलगी. माझा सगळा दिमाख गळून पडला तरीही मन सावरून बसले. मध्यंतरात कुणीसं हाका मारीत होतं. यांनी वळून पाहिलं. एक जाडगेली बाई होती... खूप गोरी. सपिटाच्या लगद्यासारखी. ओठाला जास्वंदी रंग, मोठा हेअर डू !
 'हाय अनंत हाय अनंत !! ' करीत, हातावर चापट्या मारीत ती बोलत होती.
 मध्यतंर संपलं.
 ...मूल गेलेल्या जयाची भकास मुद्रा...

३० /स्वरांत