पान:स्वरांत.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्यासाठी असंभवनीय ठरतो. हातांनी कुरतडून टाकलेल्या फुलांच्या वेदना, आणि रक्तकोमल पावलांखाली चुरडल्या गेलेल्या फुलांच्या वेदना ...
 दोन्हीही वेदनाच!
 जन्माचं अस्तित्व चिरत जाणाऱ्या ...
 खरंच हा प्रश्न मी विचारायला नको होता.
 असं म्हणून माझ्यावर अन्याय करू नकोस.
 तिच्या माझ्यातलं नातं शरीराच्या माध्यमातूनच निर्माण होणार होतं. मंत्रांच्या अक्षरांची उदात्त झालर लावली तरी सर्वांच्या साक्षीनं दिला गेलेला तो परवानाच होता. आमच्या शरीरांना एकत्र येण्याचा ! पण मलमली शरीरांच्या आत गुंडाळलेलं असतं एक मन.
 शरीराचे पापुद्रे सोलताना मनाची नाती जुळतील असं वाटलं होतं. एका बेसावध क्षणी घेतलेला निर्णय ... तपकिरी व्याकूळ डोळे विसरायला लावणारा नवा बंध निर्माण होईल अशी आशा वाटली होती.
 पण ...
 बापाचा प्रचंड पैसा, त्या पैशाच्या बळावर मिळालेला देखणा पती आणि परदेशातलं अद्भुत जीवन यांच्या नव्या कैफात ऊर्मिलेला मला शोधावंसंच वाटलं नाही.
 मी वरवर चढत होतो. युनिव्हर्सिटीत स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटचा प्रमुख झालो. दोन पुस्तकं माझ्या नावावर आली. पैशाचा प्रचंड ओघ अंगावर आदळत होता.
 पण आम्ही एकमेकांना सापडलोच नाही. हाती लागली फक्त शरीरं. भर प्रवाहात आत्महत्या करणाराचे कपडे हाती

२० /स्वरांत