पान:स्वरांत.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तरीही हा प्रश्न मी विचारायला नको होता
 तू हा प्रश्न पहिल्या वर्षीच विचारला असतास तर कदाचित नंतरची सात वर्ष निर्माणच झाली नसती.
 तुला लिहिण्यापूर्वी शेकडो रात्री मी माझ्याशीच झुंजत होतो.
 मिल्कबरीला आल्यापासून घरचे, दारचे सारे संबंध तोडून टाकले मी.
 पूर्वेकडून येणारा वाराही मला नको होता. अनील... जेकब वा सागर कुणाच्या पत्राला उत्तर पाठवलं नाही मी. त्यांच्या पत्रातला तुझा ओझरता उल्लेख माझ्या सहनशक्तीपलीकडचा होता. सगळे दोर मी माझ्या हातांनी छाटले होते. एका दुबळ्या क्षणानं माझ्यासमोर परदेश प्रवासाचं... तिथल्या झगमगीत जीवनाचं स्वप्न उभं केलं. त्या स्वप्नांसाठी मनाचा बळी देताना काहीच वाटलं नाही. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी ऊर्मिलाला घेऊन स्वप्नांच्या देशात भरारी मारली. पहिल्याच रात्री लक्षात आलं की दोन तपकिरी डोळे माझा पाठलाग करताहेत. त्या डोळयांचा सूड घेण्याच्या इर्षेनं मी ऊमिलेवर प्रेमाचा वर्षाव करीत राहिलो. पण तृप्तीच्या प्रत्येक क्षणी अंतर्मनाला जाणवायचं, हा वर्षाव वासनांचा आहे. ही तृप्ती वासनांची आहे. पूर्ततेच्या प्रत्येक क्षणी भिंत खोल खोल खचत जायची.
 तू असं बोलताना ऊर्मिलेवर अन्याय करतो आहेस.
 तुझ्या रक्तातली वासना तिनं भावनांचे कोष विणून झेलली असेल. स्वतःतच हरवून जाणारी माणसं, स्वतःला जोजवण्यात इतकी मग्न होतात की इतरांच्या मनाचा विचार

शेष प्रश्न / १९