पान:स्वरांत.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




शेष प्रश्न

 


 ऊर्मिलेला माहित आहे तू माझ्यासाठी इथे येतोस ते ?
 ... ... ... ..'
 मी हा प्रश्न विचारायला नको होता का?
 गेली आठ वर्षे मी न चुकता इथे येतो.
 तूही येतेस...
 पहिल्यांदा वाटलं. तू येणार नाहीस.
 पण तू आलीस.
 मनाला धास्ती होती की तू हा प्रश्न विचारशील. पण तोही तू विचारला नाहीस.
 तू माझ्यावर आजही अपार विश्वास टाकला आहेस, या जाणिवेने मी आत्ममग्न... आत्मतृप्त व्हायचो.
 आजही तू हा प्रश्न विचारला नसतास तर...
 विचारणार नव्हतेही.
 तू येतोस. वर्षाची मरगळ टाकून जातोस. तृप्त नि ताजातवाना होऊन जातोस. पण मी इथून जाते रिती होऊन.