पान:स्वरांत.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

द्यायला हवं. शिवाय मोसुंव्याचा रस. टोमॅटोचं पाणी. मग कसं गुब्बु ... गुब्बु होअील. मर्फीच्या वाळासारखं!

* * *

  बॉस बरा की वर्मा ?
 बॉस गोरागोमटा आहे. मग बाळही केवड्याच्या पानासारखं होईल. पण माझा रंग घेतला तर?
 कसं का असेना ते हिरवळीसारखं लुसलुशीत नक्कीच असेल.

* * *

 'आटोपलं का?'
 त्रासिक स्वर.
 'आयला, उगाच रडण्याची ढोंगं. मेली नि अब्रू सवालाखाची राहिली.'
 'चार महिने झाले होते, म्हणे ! '
 'अहो, थांबा जरा. बाहेर आणतील तेव्हा बांधताना नीट पाहून घ्या. हो, खऱ्याखोट्याचा समक्ष पडताळा.
 'कोण होता?'
 'होता? ... ... अहो, होते म्हणाना ! नेमकं कुणाचं म्हणून सांगावं ? सुटला भाऊ.'
 'या वाढत्या पोरी म्हणजे न विझणाऱ्या दिवट्या. कधी नि कुठं आगी लावत सुटतील नेम नाही.'
 'कुणास ठाउक ! तिनंच विष घेतलंन की भावानं दिलंन. हल्ली काही कुणाचा भरोसा देऊ नये. इंदी म्हणत होती की तिला मूल वाढवायचं होतं'
 'इश्श्य ऽऽ काहीतरीच ! !'

* *

१६ /स्वरांत