पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उपासना पद्धतीत पाश्चात्य संगीत

पुनरपि वश होशी निजचित्ता-४

म्हण अपणा तरलेला
जा कर बोध समस्त जगाला-५
मीपण जोवर मेलें

नाही, खांबावरती खिळिलें-६

 राहूरीसच टिळकांनी पुष्कळ भजनें व अभंग लिहिले. एक दिवस टिळक कांहीं ख्रिस्ती मंडळीसह फिरायला गेले असतां तिकडून एक दिंडी आली. ख्रिस्ती उपासनापद्धतींत पाश्चात्य संगीताला व पद्धतीला मिळालेले प्राधान्य कमी झाले पाहिजे असें टिळकांना वाटून त्यांनी त्याच दिवशी 'तुज सोडुनी ख्रिस्ता जाउं कुठे,' 'ख्रिस्त गुरु माऊली' वगैरे पुष्कळशी प्रसिद्ध भजनगीतें रचली. भक्तिभावाने ओथंबलेले त्यांचे पुष्कळसे अभंगहि तेथेंच लिहिले गेले.
 १९०५ व १९०६ साली त्यांनी धार्मिक स्वरूपाची कविता फार लिहिली. उपसना संगीतांत ६८२ पैकी २५४ गीतें त्यांची आहेत. ह्या शिवाय 'प्रभुची प्रार्थना, व भजनसंग्रह' ही त्यांची दोन पुस्तकें ह्याच स्वरूपाची आहेत. ह्यापैकी बहुतेक ह्या काळांतील आहेत. ह्या कविता वाचल्यास त्यावेळी टिळकांची मनस्थिति कशी होती हे दिसून येते.
 आपण बुद्धीने प्रथम ख्रिस्ती झालों परंतु मनानें ख्रिस्ती होण्यास पुढे दहा बारा वर्षांचा काळ लागला असें टिळक म्हणत. व ह्या सुमारास तो दुसरा बदल त्यांच्यात होऊ लागला होता असे म्हणण्यास हरकत नाही. त्यांच्या अंतरीची तळमळ ह्या वेळच्या कवितांतून दिसून येते. त्यांच्या अंगी असलेला अभिमान लयाला जाऊन ईश्वराच्या ठायीं शरण्यवृत्ति अधिकाधिक दिसून येऊ लागली.) १९०६ साली त्यांनी लिहिलेले हे गीत म्हणतांना त्यांच्या डोळ्यांना पाणी येत असे व आम्हालाहि ते म्हणतांना अजून काही तरी निराळंच वाटते.

चाल (आरती ज्ञानराया)
शेवटी प्रभुराया । बिलगलों तुझिया पाया