पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
टिळकांचे अंतरंग

गेले रे गेलें माझें । आजवरी जन्म वाया !

तुझा मी शिष्य थोर । शिष्यधर्मी धुरंधर
वाटले अभिमानें । आतां लाज वाटे फार
मीपणे फसविलें । तुला मला दूर केले
सर्वथा स्वमनाचें । तुझ्या नांवें दास्य केलें
मजला बुद्धी नाही, । बळ नाही, ज्ञान नाही

तूंच रे तूंच माझें । आतां ख्रिस्ता सर्व काही !