पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९ : करंज्यांतला मोदक

 मासिक मनोरंजनाच्या दिवाळीच्या अंकांत करंज्यांतील मोदक नांवाची माझी एक कविता प्रसिद्ध झाली होती. ती कविता पुष्कळांना आवडली होती. “करंज्या केल्या म्हणजे त्यांबरोबर एक लहानसा मोदक केलाच पाहिजे. पुरणाच्या किंवा गुळाच्या पोळ्या केल्या, की त्यांत एक कानवला आलाच; पापड झाले की त्यांत एक लाटी तशीच राखून ठेववायची, ही जी हिंदु स्त्रियांची चाल आहे, तिचा अर्थ ह्या कवितेत सांगितला आहे."

नरनारी संगम जिकडे तिकडे पाही

बघ चरी खालती ! पहा जगी कोठेहि धृ०
वर सूर्य एकला; नाहीं ! क्षणभर नाही!
ही प्रभा नित्य त्या अलिंगुनिया राही.
हा चंद्र एकला; नाही! हाही नाही!
ह्यासवें चंद्रिका सदैव रमलेली ही !
 सप्तर्षी हे आभाळी, यांजला,
 ही अरुंधती सांभाळी, प्रेमला,
 पति बंधू यांही केली, निश्चला,
नभ नटलें तारा तारे ह्या उभयांहीं।
जें वरती दिसतें तेंच दिसे खालीही -१
ह्या नद्या सागरा जाउनि अवघ्या मिळती,
ह्या लता तरुंना सावरुनीया धरिती,
ह्या जीवकुडीचा योग न हो जरि झाला,
तरि प्राणी कोठुन मिळे जगी बघण्याला ?
 कवि आणि स्फूर्ती दोघे, भेटती,
 परिणिली मती अनुरागें, शोभती,

 तेव्हांच गायने ओघे साधती;