पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७
कां हो आला?

गोळा झालेले एका माणसाला मुंबईला पोचण्याइतके. पण टिळक भयंकर आशावादी होते. आपणास स्टेशनावर पैसे मिळणार अशी त्यांची खात्री होती. टिळकांचे परमपूज्य स्नेही रावसाहेब साठे स्टेशनवर त्यांना भेटले. त्यांनाहि मुंबईलाच जायचे होते. रात्री बारा साडेबाराचा वेळ. टिळकांनीं रावसाहेबांजवळ याचना केली रावसाहेबांनी सांगितले मजजवळ माझ्या परतेच पैसे आहेत. रावसाहेबांना कवितांचा खूप नाद लागला होता पण कवितेन पैसे थोडेच उत्पन्न होतात ! शेवटी गाडी प्लॅटफॉर्मवर येऊन उभी राहिली. टिळक व रावसाहेव गाडीत बसले. चिरंजीव खालींच राहिले गाडी हालू लागली, टिळकांनी त्याला परत जाण्यास सांगितले. त्या गडबडींत स्वारी तांग्याच पैसे सुद्धा मागून घेण्यास विसरली.
 थंडीचे दिवस, रात्र बरीच, तीहि अंधेरी, सोबत कोणी नाही. तांगे येत पण झरकन् निघून जात. पुलाखाली नदीत एखादी चिता जळत असलेली दिसे. आधीच बाबा भित्रा, त्यांत उरांत घडकी गेटच्या फाटकांत यऊन उभा राहिला ता कुत्रा अंगावर धावून गेला राणू ओसरीवर निजला होता त्याला वाटले चोर बीर आला. तो काठी घेऊन धावून गेला तो चिरंजीव!
 "कां हो आला ?"
 “आलों बाबा ! आईला उठवू नका."
 दुसऱ्या दिवशी राणून सांगितले पाहुणे परत आले! मी म्हणाले येऊ द्या. त्यांच्याशी तुम्ही कोणी काही बोलू नका. सर्वांनी नियमाप्रमाणे आपापली कामें उरकली व फराळ करून घेतले. त्याला कोणी हांक मारली नाही. तोच आंत आला.
 “ममा मी आलों!"
 “आलांत ? बरे झाले! आतां मी घराची मालकीण आहे. टिळक घरांत नाहीत. तुम्ही कांही माझे व्याही जावई नाही. मी तुमची मिजास चालू देणार नाही."
 त्यांने माझा तोफखाना गूपचिप ऐकून घेतला.
 "हा पाण्याचा बॉयलर आहे, तो चहाचा डबा, तो साखरेचा डबा, तुम्ही आपल्या अंथरुणाजवळ ठेवा हे सारें, तो बॉयलर पेटवा आणि त्यांत टाका