पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
Left
right
center
८: माझे व्याही जावयी

 कोणी चालत असेल तर त्याला उचलून कडेवर घेण्याची आम्हांला संवयच होती. त्यांतलेच हे काही प्रकार सांगते.अर्थात् ह्या बाबतीत आम्हांला दोघांनाहि कधी कंटाळा येत नसे. उलट असे काही नसले तर आम्हाला चुकल्या चुकल्या सारखे वाटे.
 एक दिवस संध्याकाळी आमच्या येथे एक पांगळा आला. त्याला अर्धांगवायू सारखें कांही झाले होते. त्याला आम्ही घरांत ठेवून घेतले. मी आणि रामभाऊंनी त्याच्या बऱ्याच खस्ता खाल्या. त्याची शेक शेगडी करायाची, त्याला खायला प्यायला द्यायचे, तर कधी कधी भरवायाचेंहि, त्याचा शेणगोठा करायाचा, ही सर्व काम आम्ही करीत होतो. त्याची गुइरीहि मला धुवावी लागत.
 रामभाऊ एक फार मोठा सज्जन माणूस होता. तो ख्रिस्ती होण्यापूर्वी आमच्याकडे आला व पुढे किती तरी वर्षे आमच्या आश्रयाला येउन जाऊन होता. परंतु बाता मारण्यांत मोठा पटाईत. तसेंच कर्ज करण्यांतहि त्याचा हातखंडा होता. त्याचे धर्मान्तर, लग्न, पुढे बायको मेल्यानंतर नऊ महिन्याच्या चिकीचा सांभाळ हे सारे आमच्याच घरीं झालें. कोठेहि कामाला राहिला तर फार सुंदर काम करी. पण वरील दोन दुर्गुणांमुळे कोठे टिकत नसे. पण आमच्या स्वभावधर्माप्रमाणेच त्याचाहि असल्याने असल्या कामांत तो अगदी मनापासून आम्हांला साह्य करी. असो रामभाऊनें व आम्ही आमच्या तैमूर्लंगाला मेहनत करून बराचसा सुधारला.
 त्याला रोज दोन आण्याच्या विड्या लागत. तीन वेळेला चहा लागे. तेंहि सारें यथास्थितपणे त्याला मिळे. बरे वाटू लागल्यावर तो आमच्याच घरी चिकटून राहिला व काही दिवसांनी तो ख्रिस्ती झाला. स्त्रिस्ती झाल्यावर मात्र त्याने आपला नूर पालटला. आपले हात स्वर्गाला पोचल्याचा त्याला भास होऊ लागला, त्याला पर फुटले. आज काय चहा चांगला झाला नाही, उद्यां काय मला वेळेवर विड्या दिल्या नाहीत, परवां काय माझें जेवणच थंड होते, तेरवा काय बेबी फार गडबड करते ! तिला आईनें मुळी