पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
घर गेलें म्है स आ ली

भोवती घिरट्या घालू लागले. मला वाटलें ठोंबरे पारडाला फिरवीत आहेत. पण मग पाहिलें तों प्रकार निराळाच. पारडू त्यांना ओढीत होतें व ते हसत होते. पण हें हसणे लौकरच थांबले. कारण ते खाली पडून आडवे झाले तरी पारडूं त्यांना ओढीतच होते व ते जमीनीवर फरपटत लाकडाच्या ओंढ्याप्रमाणे चाललेच होते. आतां बरीक ते रडू लागले. तेव्हां मी धावले व पारडाच्या गळ्यांतील दोरखंड सोडून ठोंबर्यांना मोकळं केलें. ते एकीकडे हसत होते. एकीकडे रडत होते व एकीकडे माझ्याशी भांडत होते. “तुम्हीच हे केले." मी म्हटले “मी काय केले. मी पारडू तुझ्या कंबरेला बांधलें ? अन् पारडं तुला ओढायला लागले तेव्हां मला हाका कां नाहीं मारल्यास?" मग हळद लावून शेकून दोन तीन दिवसांनी हा पार प्रताप नाहीसा केला.