पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
घर गे लें म्है स आली

 नाही दिवा न पाळणा मला पाहिजेत. हे काय असें अशुभ!"
 (“किती खुळचट कल्पना आहेत तुझ्या ?"
 "पण हे सारे विकायला काय कोठे अडले होते."
 "मी काय म्हणतो तें तुला कळत नाही. विनाकारण सहा रुपये महिना द्यावा लागत होता ना!" दोन तीन दिवसांनी मिसेस ह्यूम मजकडे भेटायला आल्या, त्यांना मी विचारले "काय हो मडमसाहेब, आमचे सहाशे रुपये तुमच्याकडे ठेवले आहेत ना?"
 “कशाचे?"
 “राहूरीच्या घराचे ?"
 "नाहीं कांहीं! ते तर टिळकांनी त्या गृहस्थाला कर्ज फेडायाला दिले !"
(माझं तोंड अगदी पहाण्यासारखे झाले. टिळक घरी आल्यावर मी त्यांना विचारले. ते म्हणाले, “हो, दिले मी ते त्या माणसाला ! काय म्हणणे आहे तुझें ?"
 "पण हे तुम्ही अगोदर का नाही सांगितलें ?
 "हो सांगितलहि असते. पण मग तूं मला हे पैसे देऊ दिले असतेस का?" घर गेलें. घर बांधून देणारे गेले. घेणारे गेले. डोळ्यांचे पाणी गेले. पाणीदार आठवणी मात्र अजून आहेत. पांचशे रुपये गेले. रोखा तेवढा अगदी आतापर्यंत कायम होता. उरलेले शंभर रुपये काही दिवस बँकेत टाकले नंतर त्यांत आणखी वीस रुपये घालून एक म्हैस घेतली. म्हैस दिसायाला फार सुंदर होती. पण दूध बेताचे द्यायची व दर खेपेस तिला व्हायचे टोणगे. तेव्हां तिच्या मालकाने ती आमच्या गळ्यांत बांधली! पण मागाहून तो पस्तावला; कारण आमच्याकडे आल्यापासून तिला साऱ्या पारड्या झाल्या, त्याहि लौकर लौकर झाल्या आणि म्हैस दूधहि भरपूर देऊं लागली!
 ह्या म्हशीचें टिळक पुष्कळ करीत. एक दिवस ते म्हशीला धूत होते, इतक्यांत कोणी श्रीमंत विद्वान त्यांना भेटण्यास आले. म्हशीचें प्रदर्शन पुढच्याच दारी होते. त्या गृहस्थांना टिळकांना भेटायाचे होते. तेव्हा त्यांनी म्हशीच्या ह्या गड्याला आंत जाऊन निरोप सांगायाला सांगितले. टिळकांनी