पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५
अर सि क किति हा मेला

दिवस तो एकसारखा तळमळत होता. त्यावेळी टिळकांचा पैसा, माझे व रामभाऊ धर्माधिकाऱ्यांचे श्रम, सोरावजीचे औषध व देवाची दया ह्यामुळे तो वांचला व महाराष्ट्राला त्याचा इतका उपयोग झाला. त्या वेळी मला रात्र रात्र झोप नसे. त्याचे सर्वच मला करावे लागे व म्हणून त्याला व त्याच्या आईला माझ्याबद्दल एक निराळाच स्नेहभाव वाटे. त्याची आई म्हणे 'लक्ष्मीबाई, नाना माझा नाही, तुमचा आहे. तुम्ही होता म्हणून त्याचा पुनर्जन्म झाला.'
 घरांत तो अगदी घरच्यासारखा--दत्तूप्रमाणे वागे. टिळकांच्यापेक्षा तो माझ्याच मागे मागें असायचा. टिळकांच्या समोर आला म्हणजे मात्र मोठा गंभीरपणाचा आव आणण्याचा प्रयत्न करायचा.
 कविता केली म्हणजे त्याची पहिली श्रोती मी. मी इकडे कामदारणीला काही सांगत असले किंवा कोणाशी कांहीं बोलत असले म्हणजे तिकडे त्याची कविता वाचून दाखविण्याची घाई व्हायची. आणि माझे दुर्लक्ष आहेस दिसलें म्हणजे त्याने ती कविता रागाने माझ्यापुढे टरकोवून झाडून टाकीयची. मग दत्तू बेबीने त्याला चिडवायाचें.

-“अरसिक किती हा मेला
हा कविता फाडुन बाहिर गेला"

" मग त्याने हंसायाचें व पुन्हां ती लिहून काढायची. ठोंबऱ्याला कविता फाडण्याचा बराच नाद असावा. कारण नगरला येण्यापूर्वीच्या त्याच्या बहुतेक कविता अशाच गेलेल्या आहेत. तो कांही पाठ म्हणून दाखवी. एक किनरीवाला म्हणून कविता होती. एकीत दगडावर चांदणे पडले होतें तें हरिणबालके दूध म्हणून चाटीत आहेत अशी कल्पना होती.
 ठोंबरे नगरास आल्यावर हायस्कूलमध्ये जाऊ लागला. तिसरीत किंवा चौथींत असेल तो. त्या वेळची ही गोष्ट. तेव्हां दत्तूहि हायस्कूलमध्येच होता. ठोंबरे शाळेतून आला, की लक्ष्मीबाई गोष्ट सांगा म्हणून माझ्या मागे लागायाचा. मी त्याला गोष्टी सांगून दमून गेले. ह्याचा आपला रोजचा लकडा. लक्ष्मीबाई गोष्ट सांगा.
 एक दिवस माझी विहीण--म्हणजे हौशीची सासू-आली होती. तिला जडीबुट्टीच्या औषधांची चांगली माहिती असल्याने तिची माझी मोठी गट्टी