पान:स्त्रियांचीं कर्तव्यें.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होतो ह्मणावें तर जेथें स्त्रियांचीच काय पण पुरुषांपैकीं तीन चतुर्थांश भागाची अशी स्थिति आहे अशा आमच्या हिंदुस्थान देशांत किती अन्याय होत आहे याचा हिशोब वाचकांनींच करावा. स्त्रियांची नैतिक व सामाजिक स्थिति सुधारण्याच्या काम या बाईचे प्रयत्न अद्यापि जारीनें चालले आहेत. परंतु एवढ्यानेंच ती स्वस्थ राहिली नाहीं. सज्जनांचें या ज गतांत कर्तव्य ह्मणून कधींच संपत नसतें. कांहींना कांहीं तरी परोपकाराचें काम त्यांच्यामागें नेहमीं असायाचेंच. लहानपणीं मासे गरवण्याचा तिला नाद असे. पण ती सतरा वर्षांची झाली तेव्हां तिची भूतदया जागृत होऊन तिनें हें क्रूर कर्म सोडून दिलें. जिवंत प्राण्यांवर प्रयोग करून शास्त्रीय शोध लावण्यासाठी जना- वरांचे हाल करण्यांत येतात; आणि हे खरोखरच शोधाच्या इच्छेनें नसून केवळ गमतीसाठीं करण्यांत येतात, असा जेव्हां प्रकार पारीस येथें सन १८६३ सालीं तिच्या दृष्टीस पडला तेव्हां तिनें लगेच खरमरीत लेख वर्तमानपत्रांतून लिहिण्याचा सपाटा चालविला. पुढे सन १८७४ सालीं तिनें प्राणिदुःख- निवारण सभेस अर्ज पाठविला. यांत तिला बऱ्याच मोठमोठ्या वजनदार लोकांनी मदत केली; पुढे लवकरच पार्लमेंटापुढे यांनी एक बिल (कायद्याचा मसुदा) आणविलें; त्याच्याविरुद्ध डाक्टर लोकांनीं बरीच चळवळ करून आपणही एक बिल आणिलें. तेव्हां या प्रकरणाची चौकशी करण्याकरितां कमिशन नेमण्यांत आलें. यामुळे हीं दोन्हीं बिलें मागे घेण्यांत आली. दरम्यान जिवंत प्राण्यांवरील प्रयोग बंद करण्याकरितां एक मंडळी स्थापन झाली. तिचें आनररी (बिनपगारी) चिटणविसीचें काम मिस कॉच बाईकडेच आलें. व ती त्या कामावर दहा वर्षे झणजे सन १८८५ पर्यंत होती. एवढ्या मुदतींत मंडळीच्या उद्देशास अनुसरून