पान:स्त्रियांचीं कर्तव्यें.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मंडळीनें असंख्य पत्रकें व लहान पुस्तकें प्रसिद्ध केलीं. सन १८९२ अखेरपर्यंतच्या सहा वर्षीत या बाईनें एकटीनेंच लहान मोठीं १७३ पुस्तकें या संबंधाच प्रसिद्ध केलीं. लोकांचें लक्ष या विषयाकडे वळत चालले आहे असे पाहून परत सन १८७६ सालीं एक नवीन बिल पार्लमेंटापुढ़ें आणिलें, परंतु त्याच्या विरुद्ध तीन हजार डाक्टरांच्या सह्यांचा अर्ज डाक्टर लोकांनी पाठविल्या. वरून या बिलाचा निकाल होऊन डाक्टर लोकांस पाहिजेत त्या सवलती मिळाल्या. परंतु यामुळे यत्किंचितही न डगमगतां कॉब बाईनें, जिवंत प्राण्यांवर मुळींच प्रयोग करूं नयेत असा कायदा करून घेण्याचा निश्चय केला. सन १८७९ व ८० सालीं या संबंधाचीं दोन बिलें आणविलीं, परंतु त्यांतही यश आलें नाहीं, तरी तिचा उद्योग सतत चालू आहे. या कामांत मुळींच प्रतिबंध करण्याचा मिस् काँब बाईनें आग्रह धरला नसता व जिवंत प्राण्यांवर अगदीं जरूरीच्या बाब. तींत तितके प्रयोग करूं द्यावे अशी तोडजोडीची सवलत ठेविली असती तर मिस् कॉब बाईला बऱ्याच अंशीं यश आलें असतें असें कित्येकांचें ह्मणणें आहे; परंतु मिस कॉब बाईचें यावर जें कांहीं झणणें आहे त्याचा आपण विचार केला ह्मणजे तिच्या वरील मागणीच्या योग्यपणाबद्दल व तिच्या नीतिमत्तेबद्दल आपली खात्री झाल्याशि- वाय राहणार नाहीं. तिचें ह्मणणें असें आहे की, जिवंत प्राण्यांवर प्रयोग करून ज्ञान मिळविण्याच्या रीतींतच क्रूरपणा खिळून गेलेला आहे आणि या क्रूरपणामुळे जिवंत प्राण्यांस चिरणारा शिक्षक व तसें चिरतांना पाहणारे शिष्य या दोघांचीही जी नैतिक अवनती होते ती सुद्धां फार शोचनीय आहे. सारांश, नीतिदृष्टया विचार केला तर तिला तिच्या मागणीबद्दल दोष देण्यास स्थळ नाहीं. या तिच्या प्रयत्नांत तिला बऱ्याच मोठमोठ्या भिन्न भिन्न पंथांच्या