पान:स्त्रियांचीं कर्तव्यें.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तिनें बरीच चळवळ केली. आणि मिस इलियट व मिसेस सीनी- यर यांच्या साह्यानें उद्योगगृहांत बरीच सुधारणा केली. V मिस कॉच ही ब्रिस्टल शहरीं असतां तिचें लक्ष स्त्रियांच्या स्थिती- कडे पोहोंचलें, मोठमोठ्या शहरांत स्त्रियांची जी मानसिक हानि होत असे ती तिच्यानें पाहवेना. ज्या कायद्यांत स्त्रियांच्या व पुरु- षांच्या हिताचा सारखाच संबंध आहे ते कायदे करण्याच्या कामी स्त्रियांस आपले मत प्रदर्शित करण्याचा हक्क कां असूं नये, असा • प्रश्न वारंवार तिच्या मनांत घोळू लागला. परंतु शेवटीं सन १८७८ सालीं स्त्रियांस होणाऱ्या मारहाणीच्या व निर्दयपणानें वागवि- ल्याच्या उदाहरणांची मालिका जेव्हां तिनें वर्तमानपत्रांत वाचली तेव्हां हा जुलूम बंद पाडण्यास आपल्या हातून होईल तितका यत्न केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाहीं, असा तिनें निश्चय केला. तेव्हांपासून स्त्रियांसंबंधी कायद्यांत बराच फेरफार झाला आहे; व त्यामुळे पुष्कळ स्त्रिया अशा जाचणुकीपासून व मारहाणीपासून मुक्त होत आहेत व स्त्रियांस कांहीं नवीन हक्कही मिळाले आहेत. स्त्रिया पुरुषांपेक्षां बुद्धीनें मंद आहेत असें पुष्कळांचें मत आहे. त्यावर बाईचें असें ह्मणणें आहे कीं हल्लीं त्यांचें बुद्धिवल पुरुषांपेक्षा कमी दिसतें याचें कारण त्यांस पुरुषांप्रमाणें शिक्षण मिळत नाहीं व त्यांची निगा होत नाहीं हें आहे. ती ह्मणते: "ज्यांना स्वच्छ हवा घ्यावयास मिळत नाहीं, पोटभर अन्नही खावयास मिळत नाहीं, आणि रात्रीस अवश्य तितकी सुद्धां झोंप मिळत नाहीं अशा स्त्रिया शेंकडा पन्नास सांपडतील; असें असतां आह्मी त्यांस कनिष्ट मानितों हा केवढा अन्याय आहे वरें ! " जेथें बहुतेक सर्व मनुष्यांस लिहिणें वाचर्णे येतें असें झटर्ले तरी चालेल आणि जेथें स्त्रियांस स्वातंत्र्य व मान आहे अशा इंग्लंदसारख्या देशांत जर इतका अन्याय