पान:स्त्रियांचीं कर्तव्यें.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणि ती. आज जवळ जवळ ५० वर्षे या मतास चिकटून राहिली आहे. या मताच्या संबंधानें ती ह्मणते:-" एकेश्वरी धर्म हा माझ्या आयुष्यामध्ये मला मोठा आधार आहे. माझ्या या धर्मापासून मला जितकें साह्य मिळाले आहे त्याच्यापेक्षां अधिक, किंबहुना तितकें देखील साह्य मला दुसऱ्या कोणत्याही धर्मापा- सून मिळालें नसतें. हा धर्म या जगामध्ये मला शेवटपर्यंत उ पयोगीं पडेल." एकेश्वरीधर्म ( किंवा आपल्या देशांत ज्याला ब्राह्मधर्म हाणतात तो ) मिस् कॉब बाईला इतका प्रिय झाला यांत नवल नाहीं. कोणाही विचारी मनुष्याला तो ग्राह्य वा टावा अशीच त्याची योग्यता आहे. मिस् कॉब वाईच्या चोविसाव्या वर्षी तिची आई मरण पावली; आणि तिचा बाप तिच्या पस्तीसाव्या वर्षी मृत्यु पावला. पित्याच्या मरणानंतर तिनें पालेस्टाइन येथें, ह्मणजे ख्रिस्ताच्या जन्मभूमीस, यूरोपखंड ओलांडून यात्रा करण्याचा निश्चय केला, यांत तिचें एक वर्ष गेलें. तेथून आल्यावर ती ब्रिस्टल शहरीं राहिली; आणि मिस् मेरी कारपेंटर हिला, बिघ- डलेल्या मुलांस सुधारण्याच्या आणि गरीब, निराधार मुलांची शुश्रूषा करण्याच्या कामीं साह्य करूं लागली. येथें तिच्या परोप- काराच्या कृत्यांस आरंभ झाला. मेरी कारपेंटर हिनें त्यावेळीं चारशें मुलें सुधारून त्यांस चांगल्या स्थितीस आणिलें, असें मिस् कॉब इणें एके ठिकाणीं झटलें आहे. नंतर सन १८५९ सालीं कॉब बाईनें गरीब लोकांकरितां असणारी उद्योगगृहें तपासण्यांत बराच वेळ खर्च केला. तेथें आजारी लोकांची आणि मुलांची कशी हेळसांड होत असे व त्यांना आंथरुणापांघरुणावांचून कसे हाल सोसावे लागत असत हें तिच्या दृष्टीस पडलें; त्यावरून