Jump to content

पान:स्त्रियांचीं कर्तव्यें.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाटतें तथापि, बायबल हें कांहीं ईश्वरप्रणीत नाहीं. तसेंच, मनुष्याचा आत्मा अमर नाहीं असेंही तिला वाटू लागले. तेव्हां तिनें असा संकल्प केला कीं, आपणास जें काय उत्तम व सत्य त्याप्रमाणें वागलें ह्मणजे झालें. परंतु या कोरड्या नीतीनें तिच्या मनाचें समाधान होईना. तिला वारंवार आपल्या संशयांचा पश्चात्ताप होत असे, पण हे संशय तिनें मुद्दाम कांहीं आणले नव्हते. ते तिच्या विचारी स्वभावामुळे व विद्वत्तेमुळे आले होते. त्यांचें युक्तीस अनुसरून निराकरण होईपर्यंत त्यांस मनांत न येऊं देण्याचें तिच्या स्वाधीन नव्हतें. तथापि लहानपणीं तिच्या मनावर धर्मीचा इतका संस्कार झाला होता कीं, परमेश्वराची प्रार्थना केल्यावांचून तिच्यानें राहवेना. अज्ञानरूपी अंधकारांतून काढून परमेश्वरानें आपणास ज्ञानरूपी प्रकाशांत न्यावें व सामर्थ्य द्यावें, हा तिच्या प्रार्थनेचा विषय असे. पण खिस्तीधर्माच्या भ्रांति- मूलक भागांवरील तिचा जो एकदां भरंवसा उडाला होता तो पुन्हां कधींही बसला नाहीं. तिची आई मरण पावल्यानंतर तिर्ने आपला हा धर्मसंबंधी मतभेद आपल्या पित्यास कळविला. तेव्हां त्यास तें सहन न होऊन त्याने तिला घर सोडून जाण्याविषयीं लिहून कळविलें. तेव्हां ती डोनेगल येथें जाऊन राहिली. पुढे दहा महिने लोटल्यावर तिच्या बापाने तिला परत बोलाविलें, परंतु या मतभेदामुळे तिच्यावरील लोकांचें जें प्रेम कमी झालें होतें त्यामुळे तिच्या मनास घरांत पूर्वीप्रमाणें सुख वाटेना. तथापि तिचा धर्म- संबंधी अभ्यास एकसारखा चालू होताच. तिनें थिओडर पारकर यांचा धर्मचर्चा Discourses on Religion हा ग्रंथ वाचला. त्यावरून आत्म्याच्या अमरत्वाबद्दल जो तिला संशय होता त्याचें निराकरण झाले. याप्रमाणें नास्तिकपणापासून आस्तिकपणापर्यंत व आस्तिकपणापासून एकेश्वरीमतापर्यंत ती येऊन पोहोंचली. 3