पान:स्त्रियांचीं कर्तव्यें.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ तीं, आपण मेहेरबानी करून जेव्हां आमच्या घरीं याल तेव्हां मी आपणास दाखवीन ग्रीक भाषा आणि गणितशास्त्र जरी थोडेबहुत मी शिकलें आहें तरी जेवण झाल्यावर तीं मी स्वतः धुऊन जिकडच्या तिकडे व्यवस्थित ठेवितें. " यावरून स्त्रियांला शिक्षण दिल्यानें त्या गृहकृत्यांकडे दुर्लक्ष करतील याची भीति बाळगण्याचें कांहींच कारण नाहीं; उलट, गृहकृत्यें उत्तम रीतीनें करण्याची त्यांस योग्यता येते, असें तिणें त्या डौली बाईस शिकविलें. तिचें घराणें धर्मोपदेशकांचें होतें, यामुळे ती लहान होती तेव्हांपासून धर्माच्या गोष्टी तिच्या कानीं पडत असत. ती अकरा वर्षांची झाली तेव्हां आपला पुष्कळ वेळ एकांतवासांत बायबल (ख्रिस्ती धर्मशास्त्र ) वाचण्यांत घालवीत असे; पण जसजसें तिला समजूं लागलें तसतसे बायबलांतील कांहीं असं- भवनीय गोष्टी वाचून तिच्या मनांत धर्माविषयीं संशय उत्पन्न होऊं लागले. बायबलांत जे कित्येक अद्भुत चमत्कार सांगितले आहेत ते तिला खरे वाटेनातसे झाले. आतांच्या सारखें त्या- वेळीं धर्मोदार्य लोकांत नव्हतें. बायबलांतील प्रत्येक शब्द ह्मणजे ईश्वराचा मानला जात असे; तेव्हां त्यावर संशय घेणें किंवा वाद करणें हें मोठें पाप असें लोक समजत असत. अशा स्थितीमध्ये एका बाजूनें संशयांचें व दुसऱ्या बाजूनें लहानपणा- पासून मनावर झालेल्या धर्मसंस्कारांचें तिच्या मनामध्यें जें एक- सारखें युद्ध चाललें होतें त्यापासून तिला किती दुःख होत असे, याची कल्पना, , परंपरागत चालीरीतींस डोळे झांकून अनुसरूं नये इतकी सुद्धां ज्यांची सत्यनिष्ठा जागृत झाली नाहीं त्यांस करतां यावयाची नाहीं. याप्रमाणें संशयरूपी वादळांत ४/५ वर्षे गटं- गळ्या खाल्ल्यावर तिचा असा विचार झाला कीं ईश्वर आहे किंवा नाही याबद्दल आपणास कांहीं खात्रीने सांगता येत नाहीं,