Jump to content

पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सील करण्यासाठी बेडशीट, लाख, मेणबत्ती, काडेपेटी असं साहित्य जमवून ठेवायला लागायचं. प्रत्येकाचे रोल ठरलेले असायचे. ज्या जिल्ह्यात जायचं, तिथल्या सिव्हिल सर्जनचा नंबर मिळवायचो. ते कसे आहेत, सहकार्य करणारे आहेत का, पोलिस अधीक्षक कसे आहेत, याची माहिती घ्यायचो. गाडी किती अंतरावर उभी करायची, हेही ठरवून ठेवायचो.

 माया पवार, बबलू, शैलाताई (मावशी), कैलास सगळे तयार आहोत, असं सांगायचं ठरलं. हॉस्पिटलपासून पाच-सात घरं सोडून गाडी उभी केली आणि कार्यकर्त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवून मी तिथंच बसून राहिले. कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये गेले, तेव्हा डॉक्टर कुत्र्याला फिरवायला घेऊन गेले होते. तिथल्या लोकांनी कार्यकर्त्यांची चौकशी केली, तेव्हा सरळ 'मुलगा-मुलगी बघायला आलोय,' असं त्यांनी सांगून टाकलं. इतक्या उघडपणे सगळं चाललं होतं. एजंटही कार्यरत आहेत, असं समजलं होतं. कुत्र्याला फिरवून डॉक्टर आले, तेव्हा वाटलं की, ते अंघोळ वगैरे करून येतील. पण ते लगेच करू,' म्हणाले. खर्च जास्त येईल, असं सांगून त्यांनी दोन हजार रुपयांचा आकडा सांगितला. शिवाय, मोठ्या रकमेच्याच नोटा द्यायच्या, असंही सांगितलं. आमच्याकडे नोटा आणि त्यांचे नंबर लिहिलेलं अॅफिडेव्हिट तयार होतं. हॉस्पिटलमध्ये हे सगळं सुरू असताना मी फोनाफोनी ना, याची खात्री केली. वेळ पडलीच तर अगदी मंत्रालयापर्यंत पोहोचता आलं पाहिजे, अशी तयारी मी नेहमी करून ठेवत असे.

 डॉक्टरांनी पेशंटला आत बोलावलं. आपल्या सुनेलाही बोलावून घेतलं. सासरेबुवांनी ही सगळी प्रक्रिया पाहायला कौतुकानं सूनबाईंना बोलावलं होतं. शैलाताईंच्या पर्समध्ये छोटा टेपरेकॉर्डर सुरू होता. त्यातली कॅसेटसुद्धा खूप छोटी. फक्त ढाब्यावरच्या पानपट्टीत मिळायची. माया, शैलाताई सगळे समोर असताना सुनेला समजून सांगताना डॉक्टरांना चेव चढला. अशोभनीय भाषेत तो चवीनं सुनेला माहिती सांगत राहिले. पटकन आवरायचं सोडून टाइमपास करत राहिले. दोन हजार आधीच घेतले होते.

३९