Jump to content

पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डॉक्टरांनी कैलास आणि शर्वरीला केबिनमध्ये बोलावलं दोघेही शांत बसले होते. डॉक्टरांनी रिपोर्ट सांगायला सुरुवात केली. यवेळी रिपोर्ट चांगला नाही. मुलगी आहे असं म्हणला आणि दोघांनी चेहरी पाडले. तुम्ही व्यवस्थित बघितलंय ना, असं कैलासनं त्यांना विचारले खात्रीशीर आहेत ते डॉक्टरांची नजर तयार आहे त्यांचा, रिपोर्ट चुकीत नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे." डॉक्टरांनी उत्तर दिलं. पुढे काय करायचं? "कैलासने विचरलं डॉक्टर म्हणाले. “माझ्या पॅकेजप्रमाणे मुलगी असेल तर खाली करुन देणार. त्यामुळे अडमिट व्हा." शर्वरी म्हटली, "अडमिट होणार नाही. इंजेक्जन घेणार नाही. मला भीती वाटते. "कैलासनं तिला काही होणार नाही." अस सांगितलं. तरीसुधदा शर्वरी नकार देत होती. कैलासनं डॉक्टरांना नकी मुलगीच आहे का? असं विचारलं त्यावर डॉक्टर चिडलं. म्हणाले मी माझ्या डोळ्यांनं बघितलं आहे.सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांसुध्दा सांगितलं. आता तुम्ही निर्णय घ्या." शर्वरी पुन्हा नाही म्हणाली आणि तिथं त्यांचा ड्रामा सुरु झाला. शर्वरीला कैलास रागवायला लागला “तु इथे अडमिट हो, नाहीतर तुझ्या गावी निघून जा. माझ्या डोक्याला ताप नको देऊस" असा दंगा कैलासने घातला. शर्वरीनं रडायला सुरुवात केली. कानाखाली वाजवीन असं कैलास म्हणाला, तेव्हा डॉक्टर घाबरले आणि दोघांना शांत केलं. कैलासला बाहेर काढलं आणि ते शर्वरीचे कौन्सिलिंग करुन लागले. तिला समजून सांगू लागले. तिला अडमिट होण्याची विनंती केली. पुन्हा कैलासला आत बोलावलं. “तुमची बायको अडमिट व्हायला तयार आहे" असं सांगितलं. शर्वरीने इंजेक्शन न घेण्याचा निर्णय सांगितला.पण अडमिट व्हायला तयार झाली होती.

 नंतर शर्वरी एका रुमध्ये जाऊन झोपली. पलीकडच्या कॉटवर कालची मुलगी झोपलेली होती. तिच्या शेजारी एक छोटं बाळ होतं. डॉक्टर शर्वरीजवळ गेले आणि तिला सांगितलं."तु कशाला घाबरतेस ? ही बघ कालची मुलगी. रात्री डिलिव्हरी केली. आता घरी जाईल. एक दिवसाची प्रोसीजर असते. संध्याकाळी तुही घरी जाऊ शकते." असं सांगून त्यांनी शर्वरीला धीर द्यायचा प्रयत्न केला. कैलास शेजारी उभा होता. इतका विकृत डॉक्टर कसा असू शकतो. याचा विचार तो करता होता. ही विकृती शिक्षणामुळे तर नक्कीच आलेलली नसेल. मी ज्यूस घेऊन येतो. असं सांगून कैलास खाली उतरला. मी खाली होतेच. सर्व अधिकारी गोळा केले होते. संरक्षणासाठी पोलिसही होते. कैलासने खाली येऊन आम्हाला वर यायला सांगितलं. काम झालंय. असं म्हटल्याबरोबर ताफा घेऊन मी थेट दवाखान्यात गेले. डॉक्टर केबिनमध्ये होते. निघायच्या तयारीतच होते. त्याचा आजचा धंदा झाला होता. आम्ही सगळे

२७