Jump to content

पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आत गेलो. त्याला बसायला सांगितले आणि आधी खिशातील नोटा बाहेर काढ, असं मी म्हणलो. तो नाही नाही करुन लागला. मी तुम्हाला ओळखत नाही. मला काहीच माहिती नाही. माझ्याकडे कोणीच नव्हतं असं म्हणून लागला. शर्वरीला जिथं अॅडमिट केले होतं तिथं आम्ही सगळे गेलो. तिला का अडमिट केलंय असं विचारलं त्यावर त्यांच्या तिच्या पोटात दुखतंय असं कारण सांगितलं. आम्ही तिच्याच सोबत आलोय. याची कल्पना डॉक्टरांना त्या क्षणापर्यंत आली नव्हती

 “ पोटात मुलगी आहे. गर्भपात करण्यासाठी अडमिट केलंय." असं शर्वरी म्हणाली. तसे डॉक्टर बावचळले. त्यांनी सारवासारव करायला सुरुवात केली. आम्ही त्यांना पुन्हा त्याच्या केबिनमध्ये नेलं. सगळ्या नोटा काढायला सांगितल्या. ड्रॉव्हरमधल्या नोटा काढायला सुरवात केली. आमच्या नंबर नोंदवलेल्या नोटा बाजूला काढल्या मग मात्र डॉक्टर घामाघूम झाले. नोटांचे नंबर वाचले एकेक नोटा मिळू लागल्या. काही पैसे मिळाले नाही. त्याबद्दल विचारल्यानंतर ते पैसे सोनोग्राफी सेंटरवाल्या डॉक्टरांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही डॉक्टरांना सोबत घेतलं आणि सोनोग्राफी सेंटरवाल्या डॉक्टरांकडे गेलो. तिथं सगळ्या सेंटरची तपासणी केली आणि हे डॉक्टर आले होतेका, असं विचारलं त्यांनी ते मान्य केलं. पण मुलगा-मुलगी सांगितलं नाही. असं तो म्हणाला. दरम्यान या सगळ्या घटनंच रेकॉर्डिंग झाले होते. आणि ते रेकॉर्डिंग आम्ही त्याला ऐकवलं.

 दोन्ही डॉक्टर शांत झाले. कागदपत्रे, सोनोग्राफी मशीन, पुरावे असं संगळं गोळा केलं. मशीन सील केलं आणि पुढची सगळी कारवाई आरोग्य अधिकाऱ्यांनी पूर्ण केली. हजारो मुली वाचल्याचं समाधान आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आम्ही सगळेच खूश होता. सर्वांनी शर्वरीच अभिनंतदन केले तिच्या चेहऱ्यावर लढाई जिंकल्याचा आनंद होता. आपल्या हातून चांगलं काम घडलं म्हणून शर्वरीचं अभिनंदन केलं. तिच्या चेहऱ्यावर लढाई लिंकल्याचा आनंद होता. आपल्या हातून चांगलं काम घडलं म्हणून शर्वरीचा नवरा रविकांत खूश होता. सगळ्या चॅनल्सवर बातम्या सुरु झाल्या. पेपरवाल्यांनी गराडा घातला आणि मग आम्ही सगळे हिरो असल्याचा अविर्भावात मिरवत राहिलो शर्वरी तर म्हणाली,"माझ्या पोटी जिजाऊज येणार आहे." यानंतर आम्ही तिथून निघालो. हे सगळे होईपर्यंत रात्रीचा एक वाजला. आरोग्य अधिकारी आणि आम्ही रात्री एक वाजता एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो. सर्वानाच खूप आनंद झाला होता. डॉक्टर पकडला गेला म्हणून नव्हेत, तर

२८