पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाला.काय बोलावं कळेना. तो फक्त हो म्हटला. नंतर डॉक्टरांनी तुम्ही सगळं का करताय ? तुम्हाला सगळं परवडणार आहे का? त्याला खूप खर्च येता, अशी चर्चा करायला सुरुवात केली. हा आता गर्भलिंगदान करणार, हे निश्चित झालं. डॉक्टर पैशाची भाषा बोलू लागते. तेव्हाच कैलासनेही ओळखलं. त्यानं डॉक्टरांना सांगितलं की, तुम्ही पैशाची काळजी करु नका. किती खर्च येईल, असंही विचारलं. डॉक्टरने सांगितलं, खूप खर्च येईल. तुम्हाला तो परवडणार नाही. पण मला जरा शर्वरीला तपासायचं आहे, असं सांगून त्यानं शर्वरीला आत नेलं. ती तयार नव्हती. पण कैलासने 'काळजी करु नको,' असं सांगितलं.

 कैलासला वाटलं की, कदाचित हेच डॉक्टर सोनोग्राफी करणार आहेत. शर्वरीला कॅबिनमध्ये नेल्यावर डॉक्टरानी स्टेथोस्कोप तिच्या छातीवर लावला आणि खट-खट असा आवाज आला. त्यांनी विचारलं. कसला आवाज आला गं ? तिनं आत मोबाईल असल्याचं सांगितलं. ठिक आहे. असं डॉक्टर म्हणाले. तेव्हा शर्वरीला हायसं वाटलं.

 तपासणी झाली आणि डॉक्टर बाहेर आले. म्हणाले हे सगळं खूप रिस्की असतं. खूप काळजी घ्यावी लागते. अलीकडे कायदा खूप कडक झालेला आहे. हे बघा.. असं म्हणून त्यांनी सकाळ पेपर कैलाससमोर टाकला. पेपरमध्ये माझाच लेख होता. फोटोसहित. गर्भलिंनिदान कायद्याविषयी मुंबईमध्ये कसं दुर्लक्ष केल जातं आणि त्यामुळं मुलींची संख्या कशी कमी होत आहे. या विषयीचा तो लेख होता. लेख आणि माझा फोटो पाहिल्यावर कैलास आणि डॉक्टर एकमेकांकडे बघत राहिले. डॉक्टर म्हणाले. कळलं का आम्हाला फासाला लावाल. म्हणून आम्ही खूप काळजी घेतो आणि तुम्हाला ते परवडणारही नाही." कैलासने मात्र त्यांना पुन्हा एकदा खर्च किती येईल हाच प्रश्न विचारला त्यावर डॉक्टरांनी ९० हजारांचा आकडा सांगितला. कैलास म्हणाला," खूप खर्च आहे हो, मी एवढा खर्च करु शकत नाही. काही कमी होतात का बघा की!

 त्यावर डॉक्टर म्हणाले, 'अरे हे नव्वद हजाराचं पॅकेज असतं. त्यात गर्भलिंग निदान करून गर्भपातही करुन देतो. मुलगा असला तर काही प्रश्नच नाही. पण मुलगी असेल तरी जास्त पैसे द्यायचे नाही. त्या ९० हजारांमध्येच सगळं असतं. कैलासने त्यांना मला परवडणार नाही असं सांगितले. डॉक्टर म्हणाले,"तु मराठी माणूस आहेत म्हणून तुला साठ हजार रुपयात करुन देईन. याच्यापेक्षा कमी करून शकणार नाही." खरंतर एवढी मोठी रक्कम कैलासनं

२३