नंतर त्यांनी कैलास, शर्वरी आणि ती पत्रकार या तिघांना केबिनमध्ये बोलवलं. कैलास डॉक्टरांना म्हणाला, “ही माझी पत्नी आहे. तिला फिटसचा त्रास होतो. त्यामुळं आम्हाला एकच बाळ हवं आहे. पण मुलगाच पाहिजे. आम्ही इथले नसून बुलढाणा जिल्ह्यातले आहोत."असं सांगण्याचे कारण शर्वरीची भाषा थोडी वेगळी होती. डॉक्टरला शंका येऊ नये म्हणून असं सांगितलं. डॉक्टर चिडून कैलासवर ओरडले. म्हणाले,“कसले लोक तुम्ही ! तुम्हाला मुलगा हवा थांबू नका. निघा इथून. त्यावर कैलास म्हणाला, “चिडू
नका. माझी आई हिला त्रास देते. तिला मुलगाच हवाय. गावाकडे कशी परिस्थिती तुम्हाल माहित असेलच. माझा नाइलाज आहे. मी कितीही खर्च करायला तयार आहेत. पण कृपा करुन आम्हाला मदत करा."
डॉक्टरांनी विचारलं, "किती खर्च करणार? काय व्यवसाय करता तुम्ही?" त्यावर कैलासनं आपल्या गाड्यांचा व्यवसाय आहे, असं सांगितलं डॉक्टरांनी शर्वरीला चिारलं, “तू काय करतेस ग?" शर्वरी म्हणाली,"मी ड्रॉइंग क्लास घेते." त्यावर डॉक्टरांनी "कुठंही घेतेस," असं विचारलं. शर्वरी म्हणाली," पनवेलमध्ये."पनवेलला कुठे? डॉक्टरांचा प्रश्न. ती म्हणाली ," ब्रिजच्या पलीकडे." त्यावर, ब्रिजच्या पलीकडे म्हणजे नेमकं कुठं, असं डॉक्टर
विचारु लागले. प्रश्नावर प्रश्न विचारायला त्यांनी सुरुवात केली. कैलासला या सगळ्याची सवय होती. डॉक्टर प्रश्न विचारतात, खात्री करून घेतात. आपल्याकडे किती पेशन्स आहे हे ते बघत असतात. शर्वरी थोडी काळजीत होती; पण तीही तयार होती. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली. डॉक्टरांनी तिला कोणती चित्र काढतेस? कशी काढतेस? असे प्रश्नही विचारले. शेवटी ते म्हणालो, “केबिनमध्ये जेवढी चित्रं दिसतायत, ती सगळी मी काढलीयेत माझं जीडी आर्ट झालेलं आहे." हे एकून कैलास आणि शर्वरी हबकलेच. शर्वरीनं इकडची-तिकडची उत्तरं दिली.
नंतर त्यांनी पत्रकार मैत्रिणीकडे मोर्चा वळवला. तिला विचारलं,"तू काय करतेस? तू यांच्या सोबत कशी?" पत्रकार मैत्रिणीने सांगितलं," ही माझ्या शेजारी राहते. माझी मैत्रीण आहे." त्यांनी कैलासला आणि शर्वरीला बाहेर बसायला सांगितलं आणि त्या पत्रकार मुलीसोबत चर्चा केली. थोड्या वेळानं मैत्रीण बाहेर बसली. कैलासला आणि शर्वरीला डॉक्टरांनी पुन्हा केबिनमध्ये बोलावलं आणि सांगितलं. "मला त्या मुलीची शंका येते. ती मला पत्रकार वाटते." डॉक्टर हे वाक्य बोलले आणि कैलास एकदम शांत