पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पहिल्यांदा ऐकली होती. पण हा डॉक्टर राजरोसपणे हा व्यवसाय करत होता. डॉक्टरांकडे सोनोग्राफी मशीन दिसत नव्हतं. बहुतेक डॉक्टर दोघांना सोनोग्राफीसाठी दुसरीकडे नेणार,अशी शंका कैलासला आली. डॉक्टरांनी एक फोन केला आणि विचारलं अरेज आज बैठोगे क्या? बहुतेक फोनवर बोलणार माणूस सोनोग्राफी करणारा असावा. थोडा वेळ त्याच्याशी गप्पा झाल्यानंतर डॉक्टरांनी फोन खाली ठेवला आणि कैलासला सांगितलं की, आज डॉक्टर बाहेरगावी आहेत. उद्या आपण हे सगळं करून. पण आज तुम्हाला अॅडव्हान्स मला द्यावा लागले. त्याशिवाय उद्या मी काय करू शकणार नाही. मला त्या डॉक्टरला आधी पैसे द्यावे लागतील. त्यावर कैलासने १०००० अॅडव्हान्स दिला. हे सगळं घडत असताना ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरु होते. दवाखान्यातून सगळे खाली उतरले. थोडं अंतर चालत गेले आणि त्यांच्या गाडी आल्यावर तिथे गाडीत बसले. मी कैलासला काय-काय झालं.हे विचारलं. कैलासले सगळी माहिती दिली आणि उद्या येताना त्या दुसऱ्या मुलीला घेऊन येऊ नका असं डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती दिली. त्याला तिची चांगलीच शंका आलेली होती. एवढी मोठी रक्कम जमवावी लागेल आणि तोपर्यंत कुणाला काही सांगू नका,' असं मी आलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं.

 तिथून आम्ही पुढच्या मोहिमेवर निघालो. साकीनाका येथे पत्रकार मैत्रिणीनं अपॉइमेंट घेऊन ठेवलेली होती. त्यानुसार आम्ही ठाण्याहून साकीनाक्याकडे मोर्चा वळवला. तिथल्या डॉक्टरकडे शैलाताई, शर्वरी आणि ती पत्रकार मैत्रीण असे सगळे गले. कैलास माझ्याजवळच थांबला. कारण सिस्टीम सोबत नेलेली होती. डॉक्टर त्यांची वाटच बघत होते. तिघी आत जातात डॉक्टरांनी तपासणी केली. ते स्वत: रेडिओलिस्ट होते. त्याच्याकडे

मशीनही होतं. त्यांनी तपासणी केली आणि मुलगी आहे असं सांगितलं. एवढ्याबिनधास्तपणे त्यांनी सांगितलं याचं जरा आश्चर्यच वाटलं या लोकांना कायद्याचा धाक किती कमी आहे, हे जाणवलं. शैलाताईंनी त्याला दहा हजार रुपये रोख दिले. गर्भपात करायचा असल्यास जास्त पैसे द्यावे लागतील. असं डॉक्टर म्हणाले. शैलाताईंनी त्याला विचार करुन येतो' असे सांगितलं ते सगळं बाहेर आले. हे सगळं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत होतं. आम्ही सगळे दवाखान्या बाहेर उभे होतो. आमच्यासोबत अधिकारीसुध्दा होते. ठाण्याची आणि साकीनाक्याची हद्द वेगवेगळी असल्यामुळे आता वेगळेच अधिकारी आमच्यासोबत होते. शैलाताई, शर्वरी आणि पत्रकार मैत्रिणींन माझ्याकडे येऊन सगळा प्रकार सांगितला आणि तो रेकॉर्ड झालाय असंही सांगितलं.

२४