पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मी त्याला सांगितले काही काळजी करून नको, मी माझी गाडी घेऊन येते आणि कैलास ड्रायव्हिंग करणार आहे. त्यामुळं सुरक्षित पोहाचेल." कैलासचं ड्रायव्हिंग उत्तम आहे. हे रविला सुध्दा माहित होतं. त्यामुळं त्यांना तयारी दर्शविली आणि कामाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला.

 मी आणि कैलास बुलढाण्याकडे निघालो. बुलढाणा ७० किलोमीटर राहिलं. तेव्हा वळिवाचा पाऊस सुरु झाला. पाऊस प्रचंड होता. पुढचा रस्तादेखील दिसेना. रात्रीचे साधारणअकरा वाजले होते. खरं तर आम्ही बारापर्यंत पोहाचयला हवं होतं. परंतु पोहोचायला तब्बल दोन वाजले. रवी तयारच होता. शर्वरीही तयार होती. आम्ही येणार म्हणून जेवायला वाट बघत बसले होते. दोघे रात्री दोन वाजता सगळे जेवलो आणि तीन वाजता पुन्हा प्रवास सुरु केला. बुलढाणा ते मुंबई नऊ वाजता पनवेलला पोहोचलो. माझी धाकटी बहिण मेघा डॉक्टर आहे. ती पनवेलला राहते शर्वरी आणि रविकांतला तिच्याकडे आराम करायला सांगितलं आणि आम्ही त्या पत्रकार मैत्रिणीला भेटायला आणि पुढच्या नियोजनासाठी मुंबईत पोहाचलो. मुंबईतली कामं संपवून पनवेलच्या दिशेने निघालो. मेघानं स्वयंपाक करुन ठेवला होता.

 स्टिंग म्हटले की, कार्यकर्त्यांची मदत लागते. गरोदर महिलेसोबत कधी आत्या बनून तर कधी मावशी बनून कुणीतरी ओळखीचं किंवा रक्ताचं लागतंच. आमच्याकडे आत्या, मावशीचा रोल पर्मनन्टली शैलाताई करतात. डोक्यावर पदर घेऊन पेशंटसोबत जातात. त्यांना साताऱ्याहन बोलावन घेतलं. सोबत मायाला घेऊन यायला सांगितलं. माया म्हणजे स्टिंगमधील कॉमन पर्सन. कुठंही, कशीही, कधीही माया स्टिंगमध्ये फिट बसते. शैला आणि माया साताऱ्याहून पनवेलला आल्या. मी येणार म्हटलं की मेघा खूश असते. रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारतो. तिला माझ्या कामाविषयी खूप आदर आहे. माझ्या कामाविष्यी जाणून घ्यायला ती उत्सूक असते. त्य दिवशी मुंबईतून पनवेलला पोहाचायला रात्रीचे नऊ वाजले होते. मेघा, तिचा नवरा सुधीर आणि मुलगी सूमेधा तिघेही वाटच बघत होते जेवणासाठी. सुधीर केरळाचा. त्यामुळं त्याची मराठी भाषा फार मजेशीर. भुकेने व्याकूळ झाला होता तो. म्हणाला अरे कधीपासुन मी भुकेली आहे, पोटामधी कावळा ओरडतो आहे. ' मी म्हटले, 'सुधीर भकेली नाही रे.. जेंडर बदलातेयस. मी भुकेला आहे. असं म्हणा दाजीबा' सगळे हसले आणि जेवायला बसले. जेवताजेवता सुधीरने मला विचारलं, अरे वर्षा, कायदेशीर गर्भ ऐसा कुछ होता हे क्या?" मी म्हटलं. कायदेशीर गर्भपात सही हे वर्ड है! ये कहना चाहते हो क्या ?" सुधीरने “हा,

१९