Jump to content

पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऐसाही कुछ था रुक मैने फोटो निकाला है! ये मस्जिद बंदर स्टेशन के बाहर, सीढीया चढते समय ये बोर्ड चिपकाया था ! मुझे लगा की तू इसमे काम करती है ! कुए गलत भी रहेगा" असं म्हणत त्यांनी फोनमधून काढलेला फोटो मला दाखवला. त्यामध्ये कायदेशीर गर्भपात केंद्र. काही समस्या असल्यास संपर्क साधा,' असा बोर्ड होता. खाली पता, फोन नंबर होता. ठाण्यातील तीनहात नाका इथला पत्ता होता. दिलेल्या फोन वर फोन करुन बघावा म्हणून मी कैलासला फोन करण्यास सांगितलं. कैलासनं फोन लावला तर डॉक्टरांनी फोन उचलला. कोण, काय प्रत्यक्ष या आणि बोला, असं म्हणून सकाळी दहापर्यंत यायला सांगितलं. खरंतर ठाण्यात अपॉइमेंट मिळाली होती आणि सांकीनाकासुध्दा ! दोन अपॉइमेट मिळाल्यामुळे हे कसं काय निभावायचंय असा मला प्रश्न पडला. पण आधी आपण ठाण्यामध्ये त्या डॉक्टरला जाऊ भेटू, असं ठरवलं. त्याने सकाळी दहाची वेळ दिली होती. त्यानुसार सकाळी नऊ वाजता आवरुन आम्ही ठाण्याला जायचं ठरवलं.

 शर्वरी, रविकांत, शैलाताई, माया, कैलास आणि मी असे सगळे आमच्या गाडीतून निघालो. शर्वरीने काय सांगायचं, कैलासनं काय सांगायचं, दोघांमध्येही कोणतीही गफलत होता कामा नये, त्यासाठी मी त्यांना त्यांचे रोल काय आहेत ते समजून सांगितलं. मी म्हणाले,“ शर्वरी, तू चित्रकलेची शिक्षिका आहे, ड्रॉइंग क्लास घेतेस पनवेलमध्ये, असं सांग आणि कैलास तू नवरा आहेत आणि टुरिस्टचा व्यवसाय आहे, असं सांग." दोघांनी हो म्हटलं. तसं बघितलं तर शर्वरी वकील असल्यामुळे तिला अशा केसेसमध्ये काय करायचं हे चांगलंच माहिती होतं. आणि कैलासही स्टिंग ऑपरेशनमध्ये चांगला तयार झालेला होता. आम्ही हळूहळू ठाण्याच्या दिशेने जाऊ लागला. मी शर्वरीला एक मोबाईल दिला. त्यात कोणत्याही सिमकार्ड नव्हतं. फक्त होते मेमरीकार्ड. हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी त्याचा रेकॉर्डर ऑन करायचा. अशी सूचना आम्ही शर्वरीला दिली. कैलासकडे त्याचा छुपा कॅमेरा होताच. तिकडून पत्रकार मैत्रीण मला फोन करत होती. मी तिला ठाण्यामध्ये तीनहात नाक्याला भेटूयात असं सांगितलं. आम्ही तीनहात नाक्याला पोहाचलो. मल्हार सिनेमाच्या चौकात डॉक्टरचा दवाखाना होता. शर्वरी आणि कैलास ती पत्रकार मैत्रीण जायचं म्हणत होती. मी तिला जाण्यास सांगितलं. हे तिघे मिळून दावाखान्यात गेले. रविवार होता. त्यामुळे रस्त्यावर गर्दी कमी होती. मीही दवाखान्यापासून थोड्या दूरवर गाडीत थांबले होते. माझ्यासोबत रविकांत होता. रविकांत थोडा अस्वस्थ होता. बायकोला पहिल्यांदा त्यांना असल्या मोहिमेवर पाठवलं होते. खरंतर, त्याला सोबत जायचं होतं. ऐनवेळी काहीही होऊ शकत

२०