पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लडकी है,. असे सांगितलं. बस ! काम झालं! पुढचं सगळं बोलणं बोणसच होतं. पुढे अर्धा तास कैलासनं डॉक्टराकडून चार पाच वेळा हेच वदवून घेतलं. नीट तपासल ना ? त्या दुसऱ्या डॉक्टरांनी कन्फर्म सांगितलं ना? वगैरे-वगैरे सोनोग्राफीवाल्या डॉक्टरचं नाव रेकॉर्ड व्हावं, याची काळजी घेऊन, काम फत्ते करून कैलास खाली आला. मी पोलिस, सर्व अधिकारी, पत्रकार असा मोठा ताफा घेऊन सज्ज होते. कैलासनं 'ओके' म्हटलं आणि आम्ही तुटून पडलो. डॉक्टरच्या केबिनमध्ये गेलो विचारपूस केली तर त्याने असं काही घडलंच नाही, म्हणून हात वर केले. मग कैलासला बोलावलं. त्या ताईला बोलावलं. भाईला ताब्यात घेतलं होतं. त्यालाही बोलावलं. तेव्हा डॉक्टरांनी यातल्या कुणालाच आपण ओळखत नाही. असं सांगितलं. मग मात्र मी त्याला चांगलंच फैलावर घेतलं. मराठीत चार शिव्या हासडल्या आणि कैलासला रेकॉर्डिंग दाखवायला लावलं. मग मात्र तो घाबरला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या गाडीत बसवलं.प्रेस फोटोग्राफर गोळा झालेले.

 आम्ही सगळे डॉक्टरला घेऊन सोनोग्राफी सेंटरमध्ये गेलो. तपासणी केली त्या डॉक्टरांनीही या डॉक्टरांना ओळखत नसल्याचं सांगितलं. मग मी सगळ्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. शहरात उघड असे प्रकार होतात. सुरतमध्ये मुलींच्या संख्येत घट होतेय आणि तुम्ही काहीच कसं करीत नाही. असे विचारलं हा प्रकार अधिकाऱ्यांना खजील करणारा होता. हे लोक कुठून कुठे स्टिंग ऑपरेशन करतात आणि आपल्या हातून काहीच घडलं नाही, असं त्यांना वाटलं. किंबहुना स्टिंग ऑपरेशनचं क्रेडिट आम्हाला मिळाल्याचाही त्यांना त्रास झाला. पण आम्हाला फक्त मुली वाचवणं महत्त्वाचं होतं. क्रेडिट वगैरेच्या पलीकडे आम्ही पोहोचलो होतो. सुरतच्या अधिकाऱ्यांनी सोनोग्राफी मशीन सील केल. आमचे जबाब नोंदवले. आमच्याकडून पुरावे घेतलं. पंचनामा नोंदवला. दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतलं. त्यांचे जबाब घेतलं. त्याचे जवाब घेतलं. तोपर्यंत रात्रीचे अकरा वाजले. सगळं संपवून आम्ही परत नंदुरबारच्या दिशेने निघालो मनात प्रचंड आनंद होता. मोहिम फत्ते झाली होती. तेवढयात एका पत्रकाराचा फोन आला. आपने कैसे किया ये सब ? कितने दूर से आकर.. और क्यू?" मी त्याला शांतपणे उत्तर दिले, "सूरत की सुरत बदलने के लिये." गाडीतील सगळे हसू लागले. प्रचंड आनंद झाला होता. स्वत:चाअभिमान वाटत

होता. कारण क्रॉस बॉर्डर स्टिंग ऑपरेशनची ही पहिलीच यशस्वी मोहिम होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लुट केली होती स्वराज्यासाठी धन मिळवण्यासाठी आता आम्ही सुरतेची लूट केली होती. मुली वाचवण्यासाठी !

१६