पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मल्हार सिनेमा ते साकीनाका


 प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात काहीतरी क्रांतिकारी करण्याची इच्छा असते. आपल्या हातून समाजहिताचं काम व्हावं, त्या कामाचं लोकांनी कौतुक काहींनी सामाजिक कामाचाही धंदा मांडलाय, हे वेगळं,परंतु अजूनही काही प्रमाणिक कार्यकर्ते काम करत आहेत. त्यातला एक रविकांत तुपकर हा बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी हिरीरीनं लढणारा कार्यकर्ता. तो आमचा मित्र. मुली वाचवण्याच्या माझ्या कामाचं कौतुक वाटतं. ताई मलाही सहभाग नोंदवायचाय तुमच्या कामात," असं तो सारखं म्हणायचा. त्यांच्या मते, आम्ही म्हणजे स्टिंगचे किंग.' त्याची बायको वकिल आहे. तिचीही इच्छा होती. तिला आम्ही म्हणायचो, “शर्वरी तू प्रेग्नांट राहिली की डॉक्टर पकडायचा बर का !" तीही लगेच म्हणायची, "ताई तुम्ही सोबत असाल की कुठेही यायला मी तयार आहे.

 साताऱ्याहून बुलढाण्याचं अंतर जवळजवळ चारशे किलोमीटर. सहसा जाणं व्हायचं नाही. पण कार्यक्रमानिमित्त जात होते. महाराष्ट्रातील मुलींच्या संख्येत घट होत होती. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात मुलींची संख्या खूप कमी होती. सिंदखेडराजा म्हणजे जिजाऊंच माहेर आणि त्या ठिकाणी मलगी नको. ही मानसिकता असंण म्हणजे दिव्याखाली अंधार असंच म्हणावं लागेल. बुलढाणा जिल्ह्यातून मला खूप निमंत्रण येत असतं. परंतु अंतर जास्त असल्यामुळे काही महत्त्वाच्या कार्यक्रमालाच फक्त मी जात असे. काही अधिकाऱ्यांच्या कार्यशाळाही घेतल्या तिकडे गेलं की रविकांतकडे संध्याकाळचे जेवण, गप्पा आणि चळवळीतली गाणी असा बेत असायचा रविकांत आणि शर्वरी यांच्यामधील भांडणं, तक्रारी संगळं मी सोडवायची. अधिकारवाणीनं रागवायचीही!

 खरंतर हे सगळं कशाला सांगायचं असा प्रश्न पडेल. पण त्याचं उत्तर पुढे मिळेलच असो! आमच्या मुली वाचवण्याच्या चळवळीमध्ये प्रसारमाध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कधीकधी आमच्यासोबत येऊन स्टिंग ऑपरेशनाचा अनुभव पत्रकारांनी घेतला. अशाच एका नावाजलेल्या

१७