पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/१९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कैलासला आत बोलावलं. डॉक्टर म्हणला "का करताय? होऊद्या दुसरं. मग बघूयात. डिलिव्हरीनंतर कळणारच की काय होईल ते !"पण कैलासनं त्यांना गळ घालायला सुरुवात केली. इमोशनल ड्रामा केला. शेवटी तो "ठिक आहे, बसा बाहेर," असं म्हणाला आणि पुन्हा भाईला आत बोलावलं. भाई दहा मिनिटांनी बाहेर आला. त्याने थेट १३ हजारांची मागली केली. कैलासने हुशारीनं छुपा कॅमेरा ऑन केला आणि नोटा मोजण्यास सुरुवात केली. हळूहळू नोटा मोजत त्या कॅमेऱ्यासमोर आणल्या. पुन्हा 'मोजून घ्या, असे भाईला सांगताना तोही कॅमेऱ्यात नोटांसह दिसेल अशी काळजी घेतली. केबीनमध्ये गेल्यावर मेसेज केला. "काम सुरु आहे. पैसे घेतले."

 नंतर डॉक्टर केबीनबाहेर आला आणि फक्त ताईलाच घेऊन दुसरीकडे जाणार असल्याचं सांगितलं. ती थोडी घाबरली होती. पण कैलासने तिला काळजी करु नको असं सांगितलं. डॉक्टरला संशय येऊ देता कामा नये ! म्हणून कैलासनं सोबत जायचा आग्रही धरला नाही. डॉक्टर ताईला घेऊन जिना उतरला. तसा कैलासनं मला फोन केला. - "डॉक्टर खाली येतोय. पाठलाग करा." डॉक्टरांनी त्यांची गाडी घेतली. मी त्यांच्या मागे-मागे रिक्षानं गेले. त्यांनी ताईला एका मोठ्या सोनोग्राफी सेंटरमध्ये नेलं. अर्ध्या तासानं ते बाहेर आले. मला काय करावं हेच कळेना. या डॉक्टरला इथे पकडावं की.. मी गोंधळले. दरम्यान मी गुजरातच्या हेल्थ सेक्रेटरीशी संपर्क साधून सुरतमध्ये मदत लागेल असं सांगितलं. त्यांनी सुरक्षिततेसाठी एक पोलीस अधिकारी आणि तीन-चार पोलीस असा ताफा पाठवला. मी त्यांना कैलास ज्या हॉस्पिटलमध्ये थांबला होता त्याठिकाणी थांबायला सांगितलं. तपासणी करुन ते डॉक्टर परत आले आणि हॉस्पिटलकडे निघाले. कैलास तयारीतच होता. त्यानं कॅमेरा ऑन केला. पण त्या डॉक्टरने फक्त भाईला आत बोलावलं आणि त्याला सोनोग्राफीचा रिपोर्ट सांगितला. भाई बाहेर आला आणि मुलगी आहे, असं कैलासला सांगितलं. परंतु हेच वाक्य डॉक्टरच्या तोंडून ऐकणं, कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणं महत्त्वाचं होते.

 म्हणून कैलासनं दोन मिनिटं डॉक्टरांना भेटण्याची विनंती भाईजवळ केली. भाईने आत जाऊन विचारलं तेव्हा नाइलाजाने त्यानं परवानगी दिली. कैलास ताईला घेऊन गेला ऑडिओ आणि व्हिडीओ दोन्ही सुरु होतं. डॉक्टरसमोर उभं राहून कैलासने पुन्हा डॉक्टरला रिझल्ट विचारला. “ यांना सांगितला आहे,"असं डॉक्टरांनी भाईकडे बघून सांगितलं. कैलास म्हणाला, “ आपकी और उनकी जुबानी में फरक है, इसलिए वापस पूछा." डॉक्टरांनी

१५