पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होईल, याची शक्यता कमी वाटू लागली. दिवस फुकट गेला की काय असं वाटू लागलं. गाडी पुन्हा नंदुरबारच्या दिशेनं धावू लागली. आदिवासी संस्कृतीविषयी जाणून घेत. त्यांच्या कलेविषयी माहिती घेत प्रवास सुरु राहिला.

 तिकडे आदिवासी पाड्यांवर होळीदिवशी पारंपारिक वेशभूषा करुन स्त्रिया आणि पुरुष नृत्य करतात. वाद्य, गाणी, त्यांचा पेहराव- सगळं काही बघण्यासारखं असतं. शहरातल्या मनोरंजानाच्या साधनांपासून ते फार दूर आहेत. म्हणूनच ते सुसंस्कृत आहेत. गप्पा मारता-मारता कधी नंदुरबार आलं कळलंच नाही. हॉटेलवर उतरलो. डॉक्टर आमच्यासोबत थांबले आणि गाड़ी त्या ताईंना सोडायला गेली. फ्रेश झालो. चहा मागवला. चहा झाल्यानंतर मी कैलासला फोन करण्यास सांगितले. खिशातला कागद बाहेर काढून त्यांन फोन लावला. पहिल्यांनादा फोन उचलला नाही. पुन्हा लावला तेव्हा उचलला गेला, " हॅला, भाई मई कैलास बात करताउ - ओ हुई क्या बात?" तिकडून म्हणाला, “अरे, ओ नई बोलते है, नहीं होगा काम."

 मी कैलासवर ओरडले, “तुला जरा गळ घालता आली नाही का ? लाव परत फोन, कैलासनं परत फोन लावला, "हॅलो, भाई अरे देखो, कुछ तो करो, पैसे का टेन्शन नहीं, मै दूंगा, मगर काम होना चाहिये, मेरे लिए इतना करो भाई." तिकडून "देखता हूं, एकाद घंटे मे फोन करो," असं सांगितलं गेलं तेव्हा वाजले होते रात्रीचे दहा. पुढचं सगळं नियोजन करायचं होते. पैसे किती लागतली, याचा अंदाज नव्हता, अर्थात ते सगळं तिकडून होकार आला तर ! सरकारी डॉक्टरांनी जेवन करुन घेऊया, असे सांगितलं. जेवण रुमध्येच मागवलं. साधारण अकरा वाजता कैलासनं पुन्हा फोन केला आणि तिकडनू आवाज आला, "भाई देखो, मेरी बात हो गई है डॉक्टर के साथ, १५००० तो लगेगा." कैलासने त्याला जरा कमी करा; अशी विनंती केल्यावर “एक - दोन हजार कम होगा, सुबह मिलेंगे," कैलासं कुठे यायचं. हे विचारल्यवर मात्र त्यानं सांगण्यास नकार दिला. "सकाळी फोन करा, मग सांगतो, " म्हणला. तो किमान तयार झाला हे महत्त्वाचं होतं. पण काही अंदाज येईना. मी डॉक्टरांना एक सरकारी गाडी तयार ठेवायला सांगितलं आणि पैसेही सोबत ठेवायला सांगितलं. पंधरा हजारच्या नोटांचे नंबर प्रतिज्ञापत्रावर नोंदवयला सांगितले आणि सकाळी जायचंय, हा निरोप त्या ताईला पाठवला.

 रात्रभर मी विचार करत राहिले. तो माणूस आपल्याला कुठे नेईल? मी इथेच नंदुरबार शहरात आणेल? काहीच अंदाज येईना. परिस्थिती काय असेल

१२