दहशतीची बाजू होती. चांगल्या कामामुळं निर्माण झालेली दहशत ! कोणाला तरी कुणकुण लागली, वर्षा देशपांडे आल्यात आणि दवाखाने धडाधड बंद करून डॉक्टर गायब झाले. एका दृष्टीने चांगलं झालं किमान भीती आहे, हे तरी समजलं, परंतु दवाखाने बंद करुन ते सगळे गर्भलिंगनिदान करणारे हेते की काय ? मी म्हणारले, "चला, संध्याकाळ होऊ लागली. अनोळखी परिसर, अनोळखी माणसं. निघूया. काळजी घेतलेली बरी!" गाडी वळवळी. गावातून बाहेर पडताना सोनोग्राफी व सरकारमान्य गर्भपात केंद्र असा फलक दिसला. मी गाडी थांबवायला सांगितलं आणि कैलासला आत जायला सांगितलं म्हटलं,"
कैलास, हा एवढा एक शेवटचा प्रयत्न करुन ये. मग नको थांबायला. थेट नंदुरबारला जाऊ."
कैलास आणि ती ताई उतरली. कैलास आत गेला. दवाखाना रिकामा होता. काऊंटरवर एक सफारी घातलेला पुरुष बसला होता. त्यांच्याकडे विचारपूस केली," डॉक्टर कधी भेटतील ? ही माझी बहीण आहे. माझं नाव पाटील आहे. माझ्या बहिणीला पहिली मुलगी आहे. मी मुंबईला ड्रायव्हर आहे. बहिणीला इथंच दिलंय. तिला घरचे त्रास देतात, मुलगा पाहिजे म्हणून- "कैलासच्या बोलण्यानं तो जरा सावध झाला ; कारण भाषा वेगळी होती. परंतु कैलास हिंदीमिश्रित मराठीत बोलत राहिला. कैलास जरी मुंबईत राहत असला तरी तो आपल्याच भागातला असावा, यावर त्या माणसाचा विश्वास बसायला अर्धा तास गेला. कैलासच्या बहिणीची परिस्थिती ऐकून त्याच्यातलं बंधुप्रेम जागं झालं आणि म्हणाला " कोई फिकर नई.करु मई.. देखताव, फोन लागताव.." त्याने फोन लावला. पहिल्यांदा दवाखान्यात तो कंपाउंडर होता, त्या डॉक्टरांना त्यानं विचारलं. पलीकडून" चार दिवसांनी बोलाव," असं सांगितलं गेलं. परंतु कैलास म्हणाला, “चार दिवस राहणं शक्य नाही. माझी
उद्या गाडीवर ड्युटी आहे. मुंबईला जायचंय. पैशाची काही काळजी करु नका. जास्त-कमी लागले तरी चालेल. पण बघा काही होतंय का.." कैलासनं त्या माणसाला घोळात घ्यायला सुरुवात केली. पैशाचा विषय निघाला तसा त्यानं फोन करायला सुरुवात केली. तीन ते चार ठिकाणी फोन केले. परंतु काय बोलणं झालं हे काही समजेना. शेवटी त्यानं सांगितलं., “तुम्ही आता जा. मी जरा नियोजन करून तुम्हाला रात्री फोन करतो. कैलासला मी सांगितलं होतं की, तुला खूपच घाई आहे. असे दाखवू नको. संशय येईल... त्या माणसाचा फोन नंबर एका कागदावर त्याच्या हस्ताक्षरात कैलासनं लिहून आणला. पुरावे तयार करण्याचा अनुभव त्याला होताच. याआधी १३ ते १४ स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यांन प्रमुख भूमिका यशस्वी केल्या होत्या; परंतु आता हे स्टिंग ऑपरेशन