पान:सौंदर्यरस.pdf/८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
हरिभाऊंचा ध्येयदर्शी वास्तववाद
७९
 

तिचा अभिमान वाटतो. तुम्ही चालते व्हा !' मूर्तिभंजन याचा हाच अर्थ आहे. कुलीनता, पतिभक्ती या मूळच्या मंगल कल्पनांना हीन, स्वार्थी, अरेरावी लोकांनी अत्यंत अमंगल रूप आणलेले असते. त्या अमंगलाची ओढणी फाडून काढून त्याचे अमंगलत्व समाजाला दाखविणे हेच वास्तववादी लेखकाचे काम, हेच मूर्तिभंजन.

 यशवंताची आई गंगाबाई हिचा सासरी असाच भयंकर छळ होत असे. तिची सासू म्हणजे तिची मागल्या जन्मीची वैरीणच होती. मुलाने बायकोशी संबंध ठेवू नये, बाहेर जावे, अशीच तिची इच्छा होती. आणि तो मुलगा, गंगाबाईचा नवरा तर दिवटाच होता. व्यसनाधीन होऊन तो तरुण वयातच मेला. तेव्हाची हकीगत सांगताना हरिभाऊ म्हणतात, 'हिंदू स्त्रियांचे वैधव्य म्हणजे जिवंतपणी नरकयातना ही तर गोष्ट निःसंशय. पण ते वैधव्याचे दुःखही कमी वाटावे अशी गंगाबाईची (नवरा असताना) स्थिती होती. खरोखर पाहता नवरा मेल्याने तिच्या पाठीमागला एक दैत्यच नाहीसा झाला, असेच ज्याला त्याला वाटू लागले. आणि कोणाही दयाळू माणसास तसेच वाटणार आहे. नवरा मेला तर बरे झाले, असे म्हणणे अत्यंत विपरीत दिसेल. हा पवित्र अशा विवाहसंस्थेचा अवमान आहे असे वाटेल. पण ताई, गंगाबाई यांच्या नवऱ्यांसारखा पुरुषांनी व त्यांच्या आयांनी आधीच त्या संस्थेचा अवमान केलेला असतो. त्या संस्थेच्या पवित्र्याचे त्यांनीच विडंबन केलेले असते. लेखक फक्त त्याचे समाजाला दर्शन घडवितो इतकेच. गणपतराव हे हरिभाऊंच्या आरंभीचे कादंबरीतील एक प्रखर बुद्धिवादी सुधारक. बालपणीच मुलीचे लग्न करून टाकणे म्हणजे तिला कायमची गुलाम करून टाकण्यासारखे आहे, मुलीचे लग्न झालेच पाहिजे. हीही कल्पना खुळचटपणाची आहे, अविवाहित राहून तिने आजन्म लोकसेवेत आयुष्य घालविले तर मुळीच आक्षेप नाही, अशा तऱ्हेचे अधर्म्य (?) विचार त्याच्या तोंडून हरिभाऊंनी वारंवार वदविले आहेत. 'भयंकर दिव्य' या कादंबरीत पुनर्विवाहाचे समर्थन करून हरिभाऊंनी असेच रूढ धर्माचे भंजन केले आहे. द्वारकाबाई ही बळवंतरावांची पुनरूढा स्त्री. कमला तिची मुलगी. दादासाहेब हे कट्टर सनातनी गृहस्थ. त्यांचा मुलगा पद्माकर हा कट्टा