पान:सौंदर्यरस.pdf/८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७८
सौंदर्यरस
 

धर्म होय. अशी दृष्टी असल्यामुळे जुन्या कर्मकांडात्मक नीतिहीन धर्मावर त्यांनी ठायी भडिमार केलेला दिसतो. दिगंबरपुर या क्षेत्राचे वर्णन करताना हरिभाऊंनी बनार्ड शॉ सारखेच विचार प्रगट केले आहेत. बहुतेक सर्व क्षेत्रे प्रथम कोणी तरी थोर विभूतीमुळे उदयास येतात. पण पुढे ते विभूतिमत्त्व नाहीसे होते. पण त्याचा अभिमान मात्र कायम राहतो. किंबहुना तो व्यस्त प्रमाणात वाढत जातो. आणि मग त्या क्षेत्राचे माहात्म्य हे एक उदरंभरणाचे साधन होऊन बसते. क्षेत्रातली विद्वत्ता व पुण्याई नष्ट झालेली असते. पण त्या मूळच्या विभूतीचे वारस आपल्याला शंकराचार्य समजत असतात. अशांचे खरे स्वरूप दाखविण्याचे कार्य हरिभाऊंनी आपल्या कादंबऱ्यांतून केलेले आहे.

 विवाहसंस्था, स्त्रीचे पातिव्रत्य मातापित्यांचा अधिकार एकत्र कुटुंबपद्धती यांना जे अत्यंत विपरीत रूप त्या काळी प्राप्त झाले होते त्याचीही हरिभाऊंनी अशीच चीरफाड करून दाखविली आहे. आणि त्या काली अत्यंत क्रान्तिकारक, अधर्म्य व नास्तिक्य बुद्धीचे असे वाटणारे विचार निरनिराळ्या व्यक्तिरेखांच्याद्वारा सांगून रूढीवर घणाघात केले आहेत. भाऊंची बहीण, ताई हिचा नवरा अत्यंत व्यसनी बदफैली व आतताई असा होता. घरात राजरोस रखेल्या ठेवून त्यांचे पाय चेपण्याचे, लुगडी धुण्याचे काम तो ताईला करावयास लावीत असे व तिला भयंकर मारहाण करीत असे. ते सर्व असह्य होऊन ताई वर एके ठिकाणी सांगितल्याप्रमाणे नवऱ्याचे घर सोडून माहेरी आली. त्यामुळे शेजारीपाजारी. नातेवाईक तिची निंदा करू लागले. ती कुलटा आहे. समाजातून उठली आहे. बाजार- बसवी आहे, असे गलिच्छ आरोप तिच्याकर होऊ लागले. ती बाटून ख्रिस्ती होऊन साहेबांशी लग्न लावणार, असे प्रत्यक्ष तिची आजी म्हणू लागली. अशा स्थितीतही त्या बहीण-भावंडांनी धीर सोडला नाही. तिचा नवरा तिला परत न्यायला आला व अद्वातद्वा बोलू लागला तेव्हा भाऊने त्याला स्पष्ट सांगितले की, 'तुमच्यासारखा नवरा असला म्हणजे तो सोडलाच पाहिजे. तुमच्या बाजारी बायकांचे पाय चेपून तुमच्या घरी मुकाट्याने राहावे इतकी कुलीनता तिच्या अंगी नाही तेच चांगले आहे. मला आज