पान:सौंदर्यरस.pdf/७७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७२
सौंदर्यरस
 

अगदी उन्हाळा झाला तरी त्यांच्याच वीरवृत्तीमुळे, त्यांनी चालविलेल्या अखंड यज्ञामुळे, समाजमतात परिवर्तन होणे अपरिहार्य होते. आणि तसे झाल्यावर सुधारकांचे संसार अगदी पहिल्याइतके अपयशी व दुःखमय राहिले नाहीत हेच वास्तवाला धरून आहे. 'भयंकर दिव्य', 'कर्मयोग' या कादंबऱ्यांतून या परिवर्तनाची चित्रे आपल्याला दिसतात. बळवंतराव आणि द्वारकाबाई यांचा संसार, त्यांनी पुनर्विवाह केला असूनही पुष्कळच सुखाचा झाला. त्यांच्या मुलीच्या- कमलेच्या लग्नाचा प्रश्न बिकट खरा. पण पद्माकरासारखा, थोर सनातन घराण्यातला तरुण आपणहून तिला मागणी घालतो आणि वडिलांच्या तीव्र विरोधाला न जुमानता तिच्याशी लग्न करतो ही प्रगती थोडी नाही. पुढे त्यांचा संसार दुःखाचा झाला हे अगदी निराळे. कारण त्या दुःखाशी त्यांनी केलेल्या पुनर्विवाहाचा, रूढीभंगाचा काही संबंध नाही. पद्माकराचे मन कमलेबद्दल निराळ्याच कारणांनी कलुषित झाले व त्यामुळे त्या दोघांवर अनेक आपत्ती कोसळल्या. पण त्याही शेवटी जाऊन कट्टर, आग्रही, सनातन वृत्तीचे अंध उपासक असे जे पद्माकराचे वडील दादासाहेब यांचेही मतपरिवर्तन होऊन त्यांनी मुलाला व सुनेला आशीर्वाद दिला आणि मग ती दोघे अतिशय सुखी झाली. अशा तऱ्हेने सुख मिळणे ही काही अवास्तव गोष्ट नाही. [या कादंबरीला 'पण लक्षात कोण घेतो' किंवा 'मी' यांच्या इतकी प्रतिष्ठा प्राप्त झाली नाही याचे कारण असे आहे की, विषयाचा एकजिनसीपणा ठेवण्यात हरिभाऊंना या वेळी इतके यश आले नाही. 'विधवा-पुनर्विवाह' ही समस्या त्यांनी घेतली होती. पण पद्माकर व कमला यांच्यात दुरावा निर्माण झाला त्याची कारणे अगदी निराळी आहेत. राजाराम या कारस्थानी गृहस्थाच्या जाळ्यात सापडून पद्माकर देशोधडीला लागतो, वाहावत जातो, भलत्याच आपत्तीत सापडतो, अशी कथेला कलाटणी मिळालेली आहे. त्यामुळे कादंबरीच्या एकरसतेचा भंग होऊन तिला थोडे घटनाप्रधान रूप येऊ लागते. पण आपला प्रस्तुत विषय तो नसल्यामुळे त्याचा प्रपंच येथे करीत नाही.] 'कर्मयोग' कादंबरीत गणपतराव व नानासाहेब या सुधारकांची कुटुंबे अगदी सुखात असल्यासारखी दिसतात. कारण आता काळ पुष्कळच पालटलेला आहे. पण सुधारणेचा झगडा हे संसार दुःखमय होण्याचे एक कारण होय. ते नष्ट