पान:सौंदर्यरस.pdf/६८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


हरिभाऊंचा ध्येयदर्शी
वास्तववाद



 पौराणिक कालापासून हरिभाऊंच्या काळापर्यंतचे वाङ्मय आपण पाहिले, त्या वाङ्मयाचे विषय काय होते याचा विचार केला, त्या कथांत कोणाच्या जीवनाचे वर्णन केले आहे हे तपासले तर हरिभाऊंनी साहित्यात कोणती क्रांती घडवून आणली ते आपल्या सहज ध्यानात येईल. आणि मग वास्तववाद म्हणजे काय हेही कळून येईल.

 पुराणकालात सर्व कथा देवदेवतांच्या किंवा फार तर तत्सम राजांच्या किंवा वीर पुरुषांच्या असत. श्रीकृष्ण, विष्णू, रामचंद्र, शंकर, गणपती, या देवतांच्या व हरिचंद्र, ध्रुव, ऋकमांगद, नल, यांसारख्या राजांच्या कथांनीच सर्व पुराणे भरलेली आहेत. त्यांतही आणखी गोष्ट अशी की या कथांत प्राधान्याने या पुरुषांच्या जीवनातील अद्भुत चमत्कार वर्णिलेले असतात. मागल्या काळातच चंद्रगुप्त, अशोक, समुद्रगुप्त, कुमारगुप्त, हर्ष असे अनेक पराक्रमी राजे होऊन गेले, पण त्यांच्या चरित्रात अद्भुत चमत्कार नसल्यामुळे त्यांच्या कथा कोणी लिहिल्याच नाहीत. देवदेवता व पुण्यश्लोक राजे याशिवाय साधुसंतांच्या कथा मागल्या काळात लिहिल्या गेल्या. पण त्याही प्राधान्याने चमत्कार कथाच आहेत. महीपतीने भक्तविजय, संतविजय इत्यादी ग्रंथ लिहून अनेक संतांची चरित्रे सांगितली. पण ज्यात चमत्कार नाही