पान:सौंदर्यरस.pdf/६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६२
सौंदर्यरस
 

हेही आपल्या ध्यानात येईल. आणि मग टीकाकार व साहित्यिक यांचे संबंध अहीनकुलवत् आहेत, साहित्यात अपयशी ठरलेला मनुष्य टीकाकार होतो, टीकाकार म्हणजे मालक गेल्यावर घरात येणाऱ्या विश्वस्थासारखा आहे, इत्यादी भ्रान्त कल्पनांना आपल्या मनात थारा मिळणार नाही.