पान:सौंदर्यरस.pdf/६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
टीकाशास्त्र आणि साहित्य-निर्मिती
५९
 

ठरीव साच्याचे रूप आले. कारण तोच साचा सर्वांनी गिरवावा असा दण्डक होता. त्यामुळे नवीनपणाला वाव राहिला नाही. साहित्यशास्त्रज्ञानीच हे दण्डक उधळून दिले असते तर लेसिंगप्रमाणे त्यांना साहित्याला नव्या प्रेरणा देता आल्या असत्या. त्या काळात चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, विक्रमादित्य, पुलकेशी यांसारखे महापराक्रमी सम्राट झाले. सातवाहन, वाकाटक, गुप्त, राष्ट्रकूट, चालुक्य या घराण्यांची साम्राज्ये उदयास येत होती, विलयास जात होती. शक-यवनाची आक्रमणे होती, ती मारून काढली जात होती. शैव, वैष्णव, नाथपंथी, बौद्ध, जैन यांच्या अनेकविध धार्मिक चळवळी चालू होत्या. आणि त्यामुळे समाजजीवन ढवळून निघत होते. पण याचा संस्कृत काव्यांत मागमूसही लागत नाही संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांनी याचे चिंतन करून मार्गदर्शन केले असते तर कदाचित् कवी इकडे वळले असते आणि मग 'कविः क्रान्तदर्शी' हे वचन खरे ठरून भारताच्या संस्कृतीला जडावस्था प्राप्त झाली नसती. पण टीकाकारांनी हे तर काही केले नाहीच; उलट अत्यंत जाचक असे दण्डक मात्र घालून ठेवले. टीकाशास्त्राचा साहित्यावर कसा प्रभाव असतो त्याचे हे फार भेदक उदाहरण आहे.

 काही मर्यादांत का होईना, पण संस्कृत साहित्यशास्त्राचा उदय आणि विकास तरी झाला. पण मराठी साहित्यशास्त्र निर्माणच झाले नाही. वर सांगितले आहे की, संतांनी आपल्या साहित्याविषयी काही सिद्धान्त मनाशी निश्चित केले होते. पण आपल्या वेदान्ती काव्यात त्यांचा क्वचित् कोठे उल्लेख करण्यापलीकडे त्यांनी त्या विषयात लक्ष घातले नाही. कारण त्यांचा तो प्रांतच नव्हता. पण प्रारंभापासून पाश्चात्त्य विद्या येथे येईपर्यंतच्या काळात, म्हणजे सहा-सातशे वर्षांत मराठीत साहित्याचे शास्त्रीय विवेचन वा समीक्षा आणि रसग्रहण असे झालेच नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रारंभी पाश्चात्त्य लेखक व साहित्यशास्त्रज्ञ यांच्याविषयी जे विवेचन केले आहे त्यावरून हे ध्यानात येईल की साहित्यशास्त्रज्ञ हा समाजजीवनाचा चांगला गाढ अभ्यासक असणे अवश्य आहे. साहित्य हे मानवी जीवनाचे चित्रण असते. तेव्हा त्या जीवनाला वळण लावणान्या, त्यावर वर्चस्व गाजविणाऱ्या धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, अर्थव्यवहार, समाजरचना, राज्य