पान:सौंदर्यरस.pdf/४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४४
सौंदर्यरस
 

इत्यादी धान्यांची पिके जोपासण्यासाठी शास्त्रज्ञ खते तयार करतात. त्या वेळी प्रथम ते या धान्यांच्या घटकांचे पृथक्करण करतात व त्यात काय द्रव्ये आहेत हे ध्यानात आल्यावर ती एकत्र मिसळून खत तयार करतात याचा अर्थच असा की की, पृथक्करणावाचून नवनिर्मिती अशक्य आहे ती निर्मिती झाल्यावर तिचा आस्वाद घेणाऱ्यांनी तिचे एकसंध रूप पहावे, समग्राचा अनुभव एकसमयावच्छेदेकरून घ्यावा, हे ठीक. पण तिचे रहस्य जाणून घेण्यासाठी तिचे विश्लेषण करण्यावाचून गत्यंतर नाही. यावरून हे दिसून येईल की, ललितकृती एकसंध असते म्हणून तिचे परीक्षणही एकसंध पद्धतीनेच झाले पाहिजे, अवयवशः करू नये, सौंदर्याचे विश्लेषण करता येत नाही, ही मर्ढेकर-कुलकर्णी या पंडितांची कल्पना अगदी भ्रान्त व सौंदर्यनिर्मितीच्या प्रक्रियेला मारक अशी आहे.