पान:सौंदर्यरस.pdf/४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४२
सौंदर्यरस
 

यांना जितके यश आले आहे, तितके दुसऱ्या कोणाला व दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने येईल असे वाटत नाही. 'वाङ्मयकृती म्हणजे भावनेची लयबद्ध आकृती असते,' असे मर्ढेकर म्हणतात. या शब्दसंहतीचा कोणताही अर्थ केला तरी टिलियार्ड यांचे समीक्षण तो प्रत्यक्षात उतरवील यात शंका वाटत नाही.

 डेव्हिड सेसिल हे ऑक्स्फर्ड विद्यापीठातील इंग्रजीचे प्राध्यापक. 'अर्ली हिक्टोरियन नॉव्हेलिस्टस्' हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात डिकन्सच्या 'कादंबरी'चे मूल्यमापन त्यांनी त्यातील अद्भुत घटना करुण- रसपरिपोष, वर्णनशैली, वातावरणनिर्मिती व्यक्तिरेखा, विनोद, रचना, त्यातील नीतीचा संदेश, बोधवाद अशा क्रमाने विश्लेषणपद्धतीनेच केले आहे. या परीक्षणात डिकन्सच्या सर्व गुणदोषांची चर्चा सेसिल यांनी केली आहे, आणि अनेक दोष असूनही डिकन्सला लाभलेल्या चिरंतन यशाचे रहस्य कशात आहे ते सांगितले आहे. इंग्लिशांना सामान्य मानवाच्या अगदी साध्या प्राथमिक सद्गुणांचा फार लोभ आहे. दया, सद्भावना, प्रेम, परोपकार या कौटुंबिक सद्गुणांचे आवाहन या समाजाच्या चित्ताला चटकन् पोचते. आपल्या या मनोभावनांचा त्यांना डिकन्समध्ये आविष्कार झालेला दिसतो. त्या मूर्त झालेल्या दिसतात. म्हणून त्याच्यावर इंग्लिशांचा जितका लोभ जडला आहे तितका दुसऱ्या कोणत्याही कादंबरीकारावर नाही.

 आता अगदी अर्वाचीन काळचे एक परीक्षण पाहून हे विवेचन संपवू. 'दि पेलिकन गाइड टु इंग्लिश लिटरेचर' या मालेच्या सहाव्या खंडात कोलंबिया विद्यापीठातील इंग्लिशचे प्राध्यापक क्वेंटिन अंडरसन यांनी जॉर्ज इलियटच्या 'मिडल मार्च' या कादंबरीचे परीक्षण केलेले आहे. १८३२ च्या सुमाराचे इंग्लंडमधल्या एका परगण्यातील लोकजीवनाचे दर्शन घडविणे हा लेखिकेचा हेतू प्रथम सांगून लगेच अंडरसन यांनी कथानकाचे परीक्षण केले आहे. या कादंबरीत डोरोथी ब्रूक, लिडगेट, वलस्ट्रोड व गार्थ असे चार कथानकाचे धागे असून हे सर्व एकजीव करण्यात लेखिकेला कसे यश आले आहे त्याचे परीक्षकांनी जरा सविस्तर वर्णन केलेले आहे. नंतर त्यांनी