पान:सौंदर्यरस.pdf/४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सौंदर्याचे विश्लेषण
४१
 

तिकेचे स्वरूप स्पष्ट केले आहे आणि नंतर हॅम्लेट, आथेल्लो, लियर, मॅक्बेथ या नाटकांचे त्या दृष्टीने परीक्षण केले आहे. हॅम्लेट या शोकांतिकेची बीजे हॅम्लेटच्या स्वभावातच आहेत, हे प्रारंभी सांगून नंतर ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी कथानकाचे परीक्षण केले आहे व प्रत्येक घटनेला हॅम्लेटच्या अति विवेकी, दोलाचल वृत्तीमुळे कसे वळण मिळाले आहे ते दाखविले आहे. त्यानंतर याच दृष्टीने हॅम्लेट व ऑफेलिया यांच्या प्रेमाचा विचार केला आहे व शेवटी राजा, राणी, प्रधान पोलोनियस, हॅम्लेटचा मित्र होरॅशियो यांच्या स्वभावाचे परीक्षण करून हे सर्व घटक या शोकांतिकेत कोठे कसे बसतात ते स्पष्ट केले आहे. पुढील सर्व शोकांतिकांची ब्रँडले यांनी अशीच समीक्षा केली आहे. प्रत्येक नाट्यकृतीत मूळ बीज कोठे आहे, ते प्रथम दाखवून नंतर कथानक, व्यक्तिरेखा, प्रेमभावना, अहंभावना यांतून त्याचा वृक्ष कसा झाला हे स्पष्ट करावे, हीच पद्धत त्यांनी अवलंबिली आहे. ब्रँडले यांचा ग्रंथ १९०४ सालचा आहे.

 आता १९३० ते ४० या दरम्यानचे एक-दोन टीकाकार पाहू ई. डब्यू टिलियार्ड हे केंब्रिज विद्यापीठातील इंग्लिश साहित्याचे प्राध्यापक. त्यांचा 'मिल्टन' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यातील 'पॅराडाइज् लॉस्ट' या मिल्टनच्या महाकाव्याची समीक्षा पाहा. प्रथम टिलियार्ड यांनी एका प्रकरणात कथानकाची रूपरेषा सांगितली आहे आणि मग ते काव्याचा विषय व ते रचण्यातला मिल्टनचा हेतू याकडे वळले आहेत. त्यांच्या मते सद्-असद्विवेकाचा संघर्ष हा या काव्याचा विषय आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाकांक्षा व सत्तामोह व बुद्धी व विषयवासना यांचाही संघर्ष यात चित्रिलेला आहे. या सिद्धान्ताचे विवेचन त्यांनी ॲडम, इव्ह, सेटन यांच्या स्वभावातील घटक, त्यांचे वेळोवेळीचे उद्गार यांच्या आधारे केले आहे. दर वेळी प्रत्येक व्यक्ती कोणत्या विकार-विचारांची प्रतीक आहे, हे दाखवीत दाखवीत त्यांनी हे विवरण केले माहे. 'पॅराडाइज् रीगेन्ड' याच्या समीक्षणात तर प्रकरणांची नावेच विषय, स्वभावरेखा, शली, रचना अशी आहेत. तेव्हा हे परीक्षण अवयवशः केलेले आहे, यात वादच नाही. मर्ढेकरांनी असल्या परीक्षणाचीच हेटाळणी केली आहे. पण मिल्टनच्या महाकाव्याचे मर्म उकलून दाखविण्यात टिलियार्ड