पान:सौंदर्यरस.pdf/४५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४०
सौंदर्यरस
 

प्रा. श्री. के. क्षीरसागर यांनी 'टीका : जुनी व नवी ' या आपल्या भाषणात मांडलेले विचार सयुक्तिक आहेत, असे वाटते. कलाकृतीच्या एकजीवित्वाचे महत्त्व त्यांनीही प्रतिपादिले आहे, आणि समीक्षेमध्ये त्याकडे दुर्लक्ष करणे यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. वाङ्मय लिहिताना कवीच्या डोळ्यांसमोर एक सुस्पष्ट जीवनाकृती असते. जीवनाची विशिष्ट कल्पना उमटविणे हा महाकवींच्या कलेचा हेतू असतो, आणि ती जीवनाकृती रसिकांना दाखविणे हा समीक्षकांचा हेतू असला पाहिजे, हे क्षीरसागरांचे मत केव्हाही ग्राह्यच आहे. समीक्षेचे हे उद्दिष्ट मनात ठेवूनच त्यांनी जुन्या टीकापद्धतीतील दोष दाखविले आहेत. पण ती जुनी टीकापद्धती म्हणजे प्रामुख्याने संस्कृत टीका- पद्धती होय. ते मल्लिनाथादी टीकाकार रस, ध्वनी, अलंकार यापलीकडे जातच नसत. क्षीरसागरांचे म्हणणे असे की, हे केवळ काव्याचे अवयव झाले. संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी कलाकृतीच्या सर्वांगांना व्यापणारे बीज न मानल्यामुळे, औचित्य आणि ध्वनी या व्यापकतर तत्त्वांचाही विनियोग जुन्या टीकालेखनात फुटकळ व जुजबी असाच होतो. जुन्या संस्कृत टीकेबरोबरच कलेचा मूळ आत्मा न ओळखणाऱ्या पाश्चात्य पौर्वात्य समीक्षाकारांवरही क्षीरसागरांनी आक्षेप घेतला आहे. पण त्यांचा सगळा आक्षेप मूळ आत्मा, म्हणजेच कलाकृतीचे एकजीवित्व विसरून पृथक् काव्यगुणांचा- रस, ध्वनी, अलंकार यांचाच विचार करणाऱ्या समीक्षेवर आहे. आणि तो सयुक्तिक आहे यांत शंकाच नाही.

 गेल्या शंभर वर्षांतील पाश्चात्त्य टीकाकारांच्या समीक्षापद्धतीचे स्वरूप पाहिले तर असेच दिसेल की, त्यातील नामांकित टीकाकारांनी पृथक्करण- पद्धतीचाच अवलंब केला आहे. कलेचे एकसंधत्व, एकजीवित्व कोणालाच अमान्य नाही. क्षीरसागर म्हणतात त्याप्रमाणे कवीच्या डोळ्यांपुढची जीवनाकृती टीकाकाराने सुस्पष्ट केली पाहिजे याबद्दलही दुमत नाही. पण टीका अवयवशः करू नये, नवा जबाबदार टीकाकार, कथानक, स्वभावलेखन, निवेदनशैली असे विश्लेषण करीत नाही, हे कोणालाच मान्य नाही असे दिसते. ए. सी. ब्रँडले यांचा 'शेक्स्पीरियन ट्रॅजिडी' हा या शतकाच्या प्रारंभी प्रसिद्ध झालेला ग्रंथ पहा. प्रथम ब्रँडले यांची शेक्सपीयरच्या शोकां