पान:सौंदर्यरस.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सौंदर्याचे विश्लेषण
२९
 

 तिसऱ्या लेखात तर देशपांडे यांनी मर्ढेकरांच्या व्यक्तित्वाचेच विश्लेषण केले आहे. काव्य किंवा कोणतीही ललितकृती एकसंध असते. त्यामुळे तिचे परीक्षण करताना भाषा, प्रतिपादनशैली, रस, अलंकार, कथानक, स्वभावपरिपोष असे पृथक्करण करू नये, असे ज्यांचे मत त्यांना हे फारच विचित्र वाटेल. मनुष्याचे व्यक्तित्व हे तर एकसंध असलेच पाहिजे. त्याचे विचार, श्रद्धा, आशा, आकांक्षा, त्याचे तत्त्वज्ञान, त्याची प्रतिभा इत्यादी सर्व मिळून त्याचे व्यक्तित्व बनते. मानवाच्या सर्व अभ्यासकांना हे मान्य आहे. पण त्यांचे परीक्षण करताना त्याचे विश्लेषण केलेच पाहिजे, हेही सर्वांना व देशपांडे यांना मान्य आहे. तसे विश्लेषण त्यांनी तिसऱ्या लेखाच्या प्रारंभी केले आहे. ते म्हणतात, 'मर्ढेकरांच्या व्यक्तित्वाला वेगवेगळे पैलू आहेत. त्यात तत्त्वज्ञ, कवी आणि माकड यांचा एक मनोज्ञ संगम आढळतो. वाचकाला त्या तिघांचे विश्लेषण करता येत नाही, आणि म्हणूनच त्यांच्याविषयी पुष्कळ गैरसमज पसरले आहेत. तेव्हा कवीचे चांगले आकलन व्हावयास हवे असेल तर विश्लेषण केले पाहिजे, असे देशपांडे यांचे मत उघड दिसते. पण यामुळे प्रा. वा. ल. कुलकर्णी त्यांना जबाबदार टीकाकार म्हणतील की नाही याची शंका येते.

 तत्वज्ञ, कवी व माकड हे मर्ढेकरांच्या व्यक्तित्वाचे घटक सांगून देशपांडे यांनी त्यातील माकड प्रवृत्तीने जे उपरोधिक काव्य लिहिले त्याचे प्रथम परीक्षण केले आहे. यातून निर्माण होणारा विनोद अतिभेसूर आहे, पण त्यानेच जगाचे सत्यदर्शन घडते, असे समीक्षक म्हणतात. मग मर्ढेकरांतील कवीने 'हया गंगेमधि गगन वितळले,' 'बोंड कपाशीचे फुटे.' 'दवात आलिस भल्या पहाटे' या भावरम्य मधुर कविता आपल्याला दिल्या आहेत, असे सांगून त्यांच्यातील तत्त्वज्ञान लिहिलेल्या कवितांचे परीक्षण करून देशपांडे यांनी ही समीक्षा संपविली ताहे.

 या सर्वांचा अर्थ असा की, ज्या कोणाला ललितकृती समजावून घ्यावयाची आहे त्याने विश्लेषणपद्धतीचा अंगीकार केला पाहिजे. अवयवशःच परीक्षण केले पाहिजे. समीक्षेची दुसरी काही पद्धती असू शकते ही