पान:सौंदर्यरस.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कल्पिताचा महिमा
१२१
 

बाबासाहेबांच्याबरोबर मावळच्या प्रवासाला जातो. कस्तुरा, सर्जा, यांच्या भावभावना त्या काळाला आणि डोंबाऱ्याच्या जातीला अनुरूप आहेत. महाराजांची सेवा आपण कशी करावी, असा प्रश्न मनात येताच कस्तुराला वाटते, आपण राजाला आपल्या दोरीवर कसरतीचा ख्योळ दावावा.! स्त्रीच्या संरक्षणाविषयी महाराजांचा कटाक्ष कसा होता ? चाफेगडचा किल्लेदार दुर्जयसाल याच्याही ध्यानात आलेले आहे की शिवाजीच्या राज्यात बाईच्या वाटेस कुणी गेला तर त्याचे हातपाय तुटतात. आपल्या राजाचा मोठेपणा सांगणारा सर्जा म्हणाला, 'केवढा मोठ्ठा राजा त्यो, कुठं आपून. काय हाय आपला मायना! पण त्येनं मला बाहूत कवळलं. (मी रायगडचा कडा येंगला.) तव्हा मला शाबास म्हनाला आन मला काळजाशी धरलं. या देहाचं सोनं झालं बघ.'
 जड सृष्टीतल्या घडामोडी, मनातल्या घडामोडी आणि यांच्या जोडीला ती भाषा,
 'ही मोगलाई काय ऱ्हातीय व्हय कायमची ? आपला राजा पुन्ना समदा पवनपट्टा जितून घेईल.' राजधानीसाठी गड कसा असावा ? 'गड बेलाग असावा, ताशीव चखोट, तालेवार असावा. बारा महाल, अठरा कारखाने राहतील असा औरसचौरस, पैस, आबदार असावा!' कस्तुरा दुर्जयसालाला कशी दिसली? 'क्या लडकी है. इष्काची परी. आता तर जादा खूबसूरत दिसतेय.' रुस्तुमराव म्हणाला, 'खुपसूरत म्हंजी ! चंद्राला म्हणतीय उगवू नगं, आन् सुक्राला म्हणतीय मावळू नगं !' रायगड किती दुर्भेद्य आहे? 'सीतेच्या अंतःकरणात रावणाला प्रवेश करणं जसं अशक्य तसंच या रायगडात शत्रूला प्रवेश करणं अशक्य आहे.' महाराज म्हणाले, 'राजधानीस जागा गडकोटावर दुसरी पहावी लागेल.', 'का ? राजगडाने काय कसूर केली महाराज ?' 'कसूर नाही सरनोबत, पण मावळमुलखाच्या जन्मकुंडलीत हा रायगड सोप्या घरात येऊन पडलाय. परवाच्या युद्धी मोगलांचा दाऊदखान अरब सहजी राजगडाच्या पायथ्यापावेतो आला !' 'होय, हे घडलं खरं. राजधानीचा गड एल्गारास अवघड पण आमदरपतीस सोयीचा असावा.' कस्तुरा रडत होती. सर्जाने विचारले, 'काय झालं